Body Modification Couple : अनेक लोकांचे वेगवेगळे छंद असतात. काही जण हे छंद आणि आवड जपण्यासाठी सर्व हद्द पार करतात. असंच एक जोडपं आहे. या जोडप्याने आपल्या शरीरामध्ये 98 बदल करत ( Body Modification ) आणि संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवत नवीन विश्वविक्रम (Guinness World Records) नोंदवला आहे. या जोडप्याने आपल्या शरीरावर शस्त्रक्रिया करून वेगवेगळे बदल केले आहेत. गॅब्रिएला आणि व्हिक्टर या जोडप्याने गेली 24 वर्षे बॉडी मॉडिफिकेशन करण्यात घालवलं आहे.


गॅब्रिएला ( Gabriela Peralta )  आणि व्हिक्टर ( Victor Hugo Peralta ) यांची भेट 24 वर्षांपूर्वी झाली. तेव्हाच या दोघांचं पहिल्या नजरेत एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांच्या लग्नाला 13 वर्षा पूर्ण झाली आहेत. हे जोडपं आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे जगतात. गॅब्रिएला आणि व्हिक्टर यांची एका मोटर सायकल कार्यक्रमात भेट झाली आणि दोघांचं आयुष्यच बदललं.


या जोडप्याने आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. डोळे आणि जीभेवरही त्यांनी टॅटू गोंदवले आहेत. व्हिक्टरने बॉडी मॉडिफिकेशन करत त्यांची जीभेचे दोन भाग केले आहेत, शिवाय कानाचा आकारही बदलला आहे. गॅब्रिएलानेही संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. 


पाहा व्हिडीओ : बॉडी मॉडिफिकेशन करणाऱ्या 'या' जोडीची अनोखी कहाणी 



लग्नाला झाली 13 वर्षे


या जोडप्याच्या लग्नाला 13 वर्षे झाली असून ते खूप आनंदी आहेत. त्यांचं एकमेकांसाठी असलेलं प्रेम आणि समर्पण याचा त्यांना अभिमान आहे. व्हिक्टरने पहिलं बॉडी मॉडीफिकेशन कपाळावरील 2009 मध्ये केलं होतं. 


बॉडी मॉडीफिकेशन करण्यामागचं कारण काय?


या जोडप्यासाठी बॉडी मॉडीफिकेशन म्हणजे शारीरिक बदल करणं कलात्मक असून अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याचं प्रतिक आहे. व्हिक्टरने याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'माझ्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक असणं हे माझ्या शरीरावरील कलेबद्दल आणि प्रेमाबद्दल मला मिळालेला पुरस्कार आहे. मी अत्यंत आभारी आहे. कारण या विक्रमामुळे मला माझं एक मोठं स्वप्न पूर्ण करण्यास मदत झाली आहे.'


त्याने पुढे सांगितलं की, बॉडी मॉडीफिकेशनसाठीचं त्याचं प्रेम आणि आवड त्याला शरीरात अधिक बदल करण्यास प्रोत्साहन देतात. या असा विश्वास आहे की, त्यांच्या यशस्वी वैवाहिक आयुष्याचं रहस्य म्हणजे कला, टॅटू बद्दलचं त्यांचं प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर आहे.