Mughal Emperor Shah Jahan Wife Mumtaz : उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथील ताजमहाल (Taj Mahal) हे प्रेमाची निशाणी मानली जाते. मुघल बादशाह शाहजहान (Shah Jahan) याने त्याच्या लाडक्या राणीची आठवण म्हणून ताजमहाल बांधला होता. शाहाजहान मुघल साम्राज्याचा पाचवा बादशाह होता. मुघल बादशाह शाहाजहानने बेगम मुमताज महलसाठी ताजमहाल बांधला. शाहाजहानची सर्वात लाडकी आणि आवडती राणी बेगम मुमताज महल होती. मुलाला जन्म देताना मुमताज महलचा मृत्यू झाला. शाहाजहानचं मुमताजवर खूप प्रेम होतं. म्हणून तिची आठवण म्हणून शाहजहानने या वास्तूची निर्मिती केली. ताजमहाल ही मुमताजही कबर आहे. बादशाह शाहाजहानची लाडकी बेगम मुमताजला तीन वेळा दफन केलं गेलं होतं.


ताजमहाल आधी दुसरीकडे दफन होती मुमताजची कबर


मुमताज महलच्या मृत्यूनंतर शहाजहाने तिची आठवण म्हणून ताजमहाल बांधला. यामुळे आग्र्यातील ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखलं जातं. बेगम मुमताज या मुघल सम्राट शाहजहानची आवडती राणी होती. जेव्हा मुमताजने तिच्या चौदाव्या मुलाला जन्म दिला. यावेळी बेगम मुमताजचा मृत्यू झाला होता. शहाजहानने बेगम मुमताजला वचन दिलं होतं की, तिच्या मृत्यूनंतरही तो इतर कोणत्याही स्त्रीच्या जवळ जाणार नाही. मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहानने ताजमहाल बांधलं, ही मुमताजची कबर आहे. दरम्यान, ताजमहाल आधी बेगम मुमताजची कबर दुसरीकडे दफन होती. बेगम मुमताजला तीन वेगवेगळ्या ठिकाणी दफन करण्यात आलं होतं. यामागचं कारण यामागचं कारण काय आहे जाणून घ्या...


बेगमला तीन वेगवेगळ्या ठिकाणी का दफन केलं?


बेगम मुमताजला ताजमहालच्या घुमटाखाली दफन करण्यात आलं आहे. मुमताजला वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेळा दफन करण्यात आलं होतं. तिच्या चौदाव्याव्या मुलाच्या जन्मावेळी मुमताजला 30 तास प्रसूती वेदना सहन कराव्या लागल्या. त्यानंतर 17 जून 1631 रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मुमताजला मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील पापी नदीजवळील बागेत दफन करण्यात आलं. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, यानंतर मुमताजचा मृतदेह बुरहानपूरच्या बागेतून बाहेर काढून आग्रा येथे आणण्यात आला. दुसऱ्यांदा, मुमताजचा मृतदेह 8 जानेवारी 1632 रोजी यमुनेच्या तीरावर दफन करण्यात आला, पण त्यानंतरही शाहजहान खूप अस्वस्थ होता.


मुमताजची आठवण म्हणून ताजमहालची निर्मिती


यामुळे त्याने मुमताजसाठी खास कबर बांधली. शाहजहानने ताजमहाल बांधला. त्यानंतर मुमताजला तिसऱ्यांदा ताजमहालमध्ये दफन करुन तिथे तिची कबर बनवण्यात आली. सुरुवातीला या वास्तूचं नाव ताजमहाल नसून काही वेगळंच होतं. बेगम मुमताज महलची कबर दफन करताना शहाजहाने याला 'रउजा-ए-मुनव्वरा' असं नाव दिलं होतं. यानंतर याला ताजमहाल हे नाव देण्यात आलं. ताजमहाल हे नाव मूळ उर्दू आहे. ताजमहाल शब्दाचा अर्थ मुकुट' म्हणजे ताज आणि मुमताज म्हणून 'महाल' असं याचं नाव पडल्याचं सांगितलं जातं.