Static Current in Human Body : कदाचित तुमच्यासोबतही असे घडले असेल की जेव्हा तुम्ही एखाद्याला स्पर्श (Touch) केला असेल किंवा कोणीतरी तुम्हाला स्पर्श केला असेल तेव्हा तुम्हाला विजेचा झटका बसला असेल. कधीकधी दरवाजा, खुर्ची किंवा एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर स्पार्कसारखा आवाज येतो आणि विजेचा धक्का बसतो. यानंतर त्या वस्तूला किंवा व्यक्तीला हात लावायलाही भीती वाटते. हिवाळ्यात असं बऱ्याचदा घडतं. हे तुमच्यासोबत नक्कीच कधी ना कधी घडलं असेल? पण असं घडण्यामागे नेमकं कारण काय आहे, याचा कधी विचार केला आहे का? यामागे एक वैज्ञानिक कारण लपलेलं आहे. असं का होतं हे जाणून घ्या. 


मज्जातंतूशी संबंधित आहे याचं कारण


या प्रकारचा विजेचा धक्का थेट आपल्या शरीराच्या नसांशी संबंधित आहे. काही लोक या विजेच्या झटक्यांना खूप घाबरतात. पण याला घाबरण्याचं कारण नाही. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. यामागचं कारण बी12, बी6 आणि बी1 या जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचं डॉक्टर आणि तज्ज्ञांचं मत आहे. जर तुम्हाला असे विजेचे झटके सतत बसत असतील तर मात्र या संदर्भात तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.


अचानक विजेचा धक्का का बसतो?


न्यूरोलॉजिस्टच्या मते, आपल्या शरीरात विद्युत क्रिया म्हणजेच इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी (Electrical Activity) सतत सुरु असते. घरांमध्ये ज्या प्रकारे इलेक्ट्रिक वायरचा वापर केला जातो आणि त्यामधील तांब्याच्या तारेवर प्लास्टिकचं कोटिंग म्हणजे आवरण असतं. त्याचप्रमाणे शरीरातील नसांवरही कोटिंग असतं, याला वैद्यकीय भाषेत मायलिन शीथ (Myelin Sheath) म्हणतात. कधीकधी हे मायलिन शीथ असंतुलित होतात. तुम्ही खूप वेळ एकाच स्थितीत राहता तेव्हा बहुतेकदा असं घडतं. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉन्स गडबडतात. या काळात अचानक एखाद्याला स्पर्श करताच मज्जातंतूंमधील मायलिन आवरण सक्रिय होतात. त्यामुळे स्पार्क होऊन विजेचा धक्का जाणवतो. 


शॉक कुणाला कमी, तर कुणाला करंट जास्त का जाणवतो?


न्यूरोलॉजिस्टच्या मते, करंट लागणं हे प्रत्येक व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असतं. त्यामुळे काही लोकांना जास्त काही लोकांना कमी प्रमाणात करंट जाणवतो. ही सामान्य प्रक्रिया आहे. पण तुम्हाला असा करंट सतत बसत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.


प्लास्टिकच्या खुर्चीचाही बसतो शॉक


प्लास्टिकच्या खुर्चीवर बसताना जेव्हा आपले पाय जमिनीला स्पर्श करत नाहीत, त्यावेळी प्लास्टिकची खुर्ची आपल्या कपड्यांमधून इलेक्ट्रॉन गोळा करते आणि त्यात सकारात्मक चार्ज जमा होतो. खुर्चीवर बसलेली व्यक्ती उठताच हा चार्ज खुर्चीच्या दिशेने जातो आणि खुर्चीला स्पर्श केल्यावर करंट जाणवतो.


कोपराला सर्वात जास्त शॉक का जाणवतो?


शरीरात अशा प्रकारचा विजेचा झटका कोपराजवळ सर्वाधिक जाणवतो. आपल्या कोपराजवळ अल्नर नावाची नस असते. ही नस मणक्यापासून खांद्यावरून सरळ हातांच्या बोटांपर्यंत पोहोचते. कोपराच्या हाडाला झाकणाऱ्या या नसेला धक्का बसताच करंट लागतो. अल्नर नसेला स्पर्श होताच आपल्या शरीरातले न्यूट्रॉन आपल्या मेंदूला सिग्नल पाठवतात आणि त्यामुळे शॉक जाणवतो.