Pollution Effect on Fly : जगभरात हळूहळू समलैंगिकतेला (Homosexuality) मान्यता मिळताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये समलैगिंक प्रेम आणि विवाहाला मान्यता आहे. म्हणजेच जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही पुरुषाशी लग्न करू शकता आणि जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही स्त्रीशी लग्न करून तिच्यासोबत आयुष्य घालवू शकता. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. पण फक्त माणूसच नाही तर किटकही आता तेच करत आहे.


माणसांमुळे माशा समलैंगिक होत आहेत


माणसाप्रमाणे आता माशाही समलिंगी होत आहेत. पण, माणसाप्रमाणे माशा स्वेच्छेन हे करत नाहीत तर, माणसाने त्यांना हे करायला भाग पाडलं आहे. प्रदूषणामुळे त्यांना जोडीदार निवडण्यात अडचणी येत आहेत. प्रदूषणामुळे माणसाप्रमाणे किटकांवरही वाईट परिणाम होताना दिसत आहे. मानवाने केलेल्या प्रदूषणाच्या भूर्दंड माणसांप्रमाणे इतर प्राणी आणि किटकांनाही सोसावा लागत आहे. परिणामी माणसाप्रमाणे आता माशाही समलिंगी झाल्याची धक्कादायक माहिती संशोधनात उघड झाली आहे.


प्रदूषणाचा किटकांवरही वाईट परिणाम


पृथ्वीवरील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे तापमानात सातत्याने बदल आणि विविध आरोग्यासंबंधित समस्या वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या प्रदूषणाची इवल्याच्या माशीवरही वाईट परिणाम झाला आहे. प्रदूषणामुळे माशांना जोडीदार निवडण्यात अडचणी येत आहेत. नर माशी आणि मादी माशी यात काय फरक आहे, हे माशांना समजत नाही. हेच कारण आहे की, आता पृथ्वीवर आढळणाऱ्या माशा नकळतपणे समलैंगिक होत आहेत.


संशोधनात धक्कादायक माहिती उघड


जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिकल इकोलॉजीच्या संशोधकांनी माशांबाबत केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या या संशोधनानुसार, नर आणि मादी माशी आता एकमेकांमध्ये फरक करू समजू शकत नाहीत. त्यामुळेच नकळतपणे मिलनासाठी नर माशी नराकडे जात आहे आणि मादी माशी मादीकडे जात आहे. या संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, माशांमध्येही समलैंगिक संबंध तयार होत आहेत.


माशा समलैंगिक होण्याचं कारण काय?


शास्त्रज्ञांच्या मते, माशांच्या समलैंगिक होण्याला पूर्णपणे मनुष्य जबाबदार आहे. संशोधनानुसार, मानवाने पसरवलेल्या प्रदूषणामुळे हा बदल माशींमध्ये होत आहे. ओझोनचे प्रदूषण वाढत आहे, यामुळे माशांवर दुष्परिणाम होत आहे. या प्रदूषणामुळे माशांमधील फेरोमोन्स नावाचे हार्मोन्स तयार होत नाही. त्यामुळे माशांना नर आणि मादी ओळखण्यात अडचणी येत आहेत.


माशा एकमेकांशी बोलूही शकत नाहीत


इतकंच नाही तर, प्रदूषणामुळे आता या फ्रूट फ्लाय म्हणजेच फळांवर घुटमळणाऱ्या माशा एकमेकांशी बोलूही शकत नाहीत. शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, ओझोनची पातळी 100 PPB राहिली तर माशांमध्ये आढळणाऱ्या फेरोमोन्स हार्मोनचा प्रभाव झपाट्याने कमी होतो. त्यामुळे माशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या हार्मोनच्या कमतरतेमुळे त्यांच्या शरीरातही अनेक बदल होत असतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी माशांवर हे संशोधन केले तेव्हा त्यांना आढळले की, 10 नर माशींपैकी फक्त 7 माशी मादी माशीकडे जात आहेत, तर तीन नर माशा नर माशींसोबत समलैंगिक संबंध बनवतात.