मुंबई : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, पेट्रोल पंपावर सीएनजी (CNG) भरताना गाडीतील प्रवाशांना गाडीबाहेर उतरण्यास सांगितलं जातं. पेट्रोल  भरताना असं सांगितलं जात नाही, मग सीएनजी भरताना गाडीबाहेर पडण्यास सांगण्यामागचं काय कारण असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच CNG गाडीमध्ये भरताना, इंधन भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान गाडीमधील व्यक्तींना वाहनातून बाहेर पडणे आवश्यक असते. सीएनजी भरताना गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींना बाहेर का यावं लागतं याचं नेमकं कारण जाणून घ्या.


CNG भरताना गाडीतून बाहेर का उतरावं लागतं?


सीएनजी स्वभावाने अस्थिर आहे. CNG वायू स्वरुपात असल्याने तो खूप अस्थिर असतो. हा गॅस भरत असताना तो ओव्हरफिल होऊन स्फोट होण्याची शक्यता असते. सीएनजी  गाडीमध्ये भरताना गाडीचालक आणि प्रवाशांना बाहेर उतरावं लागतं, यामागची मुख्य कारणे वाचा


1. सुरक्षा


सीएनजी गॅस अत्यंत ज्वलनशील असतो. गॅस भरताना गळती झाल्यास आग लागण्याचा धोका असतो. ज्यामुळे स्फोटही होऊ शकतो. प्रवासी आणि चालक गाडीबाहेर असल्यास तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणता येते.


2. दबाव


सीएनजी उच्च दाबाने भरला जातो. उच्च दाबामुळे उपकरणांमध्ये किंवा वाहनामधून गळती होऊ शकते. प्रवासी गाडी बाहेर असलेल्या लोकांच्या जीवाला होणारा धोका कमी होतो.


3. स्थिर विद्युतप्रवाह


जेव्हा एखादी व्यक्ती वाहनाच्या आत असते, तेव्हा स्थिर वीज तयार होण्याचा धोका असतो, ज्यामुळे अत्यंत ज्वलनशील CNG पेट घेऊ शकते. वाहनातून बाहेर पडल्याने स्थिर विजेच्या डिस्चार्जची शक्यता कमी होण्यास मदत होते.


4. आग लागण्याचा धोका


सीएनडी भरताना गाडीत विद्युत उपकरणे चालू असतात, ज्यामुळे ज्वलनशील सीएनजीमध्ये स्पार्क निर्माण होऊ शकते आणि आग लागण्याची शक्यता वाढते.


5. आपात्कालीन परिस्थिती


इंधन भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान CNG गळती किंवा बिघाड होण्याच्या दुर्मिळ घटनेत, प्रवासी वाहनाच्या बाहेर असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास तुम्हाला त्या क्षेत्रापासून दूर जाणे सोपे होते आणि धोकादायक परिस्थितीत अडकण्याचा धोका कमी होतो.


6.काय आहेत निर्देश?


पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने निश्चित केलेल्या निर्देशानुसार, सीएनजी भरताना गाडीच्या आत कोणीही व्यक्ती असू नये.


या सर्व कारणांमुळे सीएनजी भरताना गाडीतून बाहेर उतरल्याने प्रवासी आणि चालकांची सुरक्षितता सुनिश्चित होते. यामुळेच सीएनजी गॅस भरताना चालक आणि प्रवाशांना वाहनाबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coronavirus : कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरियंटमुळे चिंता वाढली, लक्षणे कोणती? जाणून घ्या