चेन्नई :  चेन्नईतील (Chennai Viral Video)  एक महिला चौथ्या मजल्यावरील गॅलरीत  सात महिन्यांच्या मुलीला स्तनपान करत होत्या. नंतर त्यांची मुलगी हातातून निसटून (Baby Falling Video)  पहिल्या मजल्यावरील पत्र्यावर पडली. 15 मिनिटांच्या संघर्षानंतर लोकांनी तिला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी व्ही. रम्यांना जबाबदार धरून ट्रोल केले. स्थानिक टीव्ही चॅनल्सनेही तिचे वर्णन निष्काळजी आई असे केलं होतं. या ट्रोलिंगमुळे आई   व्ही. रम्या यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये.  ट्रोलिंगमुळे त्रासलेल्या रम्या दोन आठवड्यांपूर्वी पती आणि दोन मुलांसह  कोईम्बतूर येथे माहेरी आल्या. रविवारी रम्याचे आई-वडील आणि पती लग्नाला गेले होते. ते घरी परतले तेव्हा त्यांना रम्या मृत दिसल्या.  रम्या या  चेन्नईमध्ये आयटी प्रोफेशनल होत्या 


रम्या यांनी दिलेल्या माहितीनुसार  या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंकर अनेकांनी निष्काळजी आई म्हणत रम्याला ट्रोल केले. या सर्व प्ररकारानंतर रम्या डिप्रेशनमध्ये गेली. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. 28 एप्रिलला ही घटना घडली होती. रम्या  पगरम होत असल्याने मुलीला गॅलरीत स्तनपान करत होती. स्तनपान करताना हातातून निसटून पहिल्या मजल्यावरील पत्र्यावर पडली. त्यानंतर मुलगी पहिल्याच मजल्यावर अडकली होती. आसपास  राहणाऱ्यांनी या घटनेचा व्हिडीओ काढला होता.  मुलगी वाचल्यानंतर काही लोकांनी याला ईश्वराचा चमात्कार म्हटले तर काही लोकांनी आईला  टोमणे मारण्यास सुरुवात केली. आई कशी निष्काळजी आहे, असे म्हटले.


ट्रोलिंगला कंटाळून माहेरी गेली


लोकांच्या तसेच सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगमुळे रम्या  डिप्रेशनमध्ये गेल्या. सतत त्याचा विचार करत स्वत:ला दोष देत राहिल्या. सततचे टोमण्यांना त्या कंटाळल्या होत्या.  त्यानंतर रम्या आपल्या पती आणि मुलांसोबत कोएमबतूरला निघून गेल्या. हळू हळू त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. त्यानंतर घटनेच्या एका महिन्यानंतर त्यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले.






सोशल मीडियाचा काळा चेहरा समोर 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर आई किती वाईट, निष्काळजी आहे या ट्रोलिंगला कंटाळून रम्या यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे सोशल मीडियाचा काळा चेहरा समोर आला आहे. याच सोशल मीडियाने चिमुरड्यांपासून त्यांच्या आईला छत्र हिरावले आहे. सोशल मीडियावरचे ट्रोलिंग हे नकळत झाले तरी एखाद्याच्या जीवावर बेतू शेकते. रम्या गृहिणी नव्हत्या.त्या टेक्निकल स्पेशालिस्ट होत्या. 


मुलांना सांभाळणे ही फक्त आईचीच जबाबदारी?


लहान मुलांना काही झाले तर त्याचा दोष हा वर्षानुवर्षे  कायमच आई्च्या माथी मारण्यात येतो. तुझे लक्ष नव्हते का? दिवसभर काय करत होती?  अशी वाक्ये कानावर पडतात. समाज किती प्रगत झाला तरी मुलांना सांभाळणे ही फक्त आईचीच जबाबदारी असते असे समजून आईला दोष देत आला आहे. समाजाच्या या विचारसरणीचा आज एक बळी गेला आहे.  


हे ही वाचा :


Zomato : बहिणीच्या लग्नाआधी झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट ब्लॉक, भररस्त्यात रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; कंपनीने घेतली दखल