Why Do Cats Eyes Shine in Dark : एक गोष्ट तुमच्या निरीक्षणामध्ये आली असेल ती म्हणजे मांजर (Cat), कुत्रा (Dog) किंवा इतर प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात. जर तुम्ही रात्री उशिरा काळोखातून जात असाल आणि दोन्ही बाजूला सामसूम जंगल असेल, अशात तुम्हाला काळोखात फक्त दोन डोळे दिसतात, असे तुमच्यासोबतही घडले असेल. अनेक लोक काळोखात प्राण्यांचे फक्त डोळे दिसले की, घाबरतात. प्राण्यांचे डोळे अंधारात का चमकतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का. असेल किंवा नसेल तरी येथे जाणून घ्या की, प्राण्यांचे डोळे अंधारामध्ये चमकण्यामागचं नक्की कारण काय आहे.
कोणत्या प्राण्यांचे डोळे अंधारामध्ये चमकतात?
द कन्वर्सेशन वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, प्राण्यांच्या डोळ्यांची मानवाच्या डोळ्यांपेक्षा थोडी वेगळी असते. प्राण्याच्या डोळ्यांची बनावट अशाप्रकारे करण्यात आली आहे की, त्यांना कमी प्रकाशातही स्पष्ट दिसू शकते. प्राण्यांना काळोखात शिकार करण्यासाठी किंवा दुसऱ्या प्राण्याचे शिकार बनण्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्राण्यांना अंधारातही चांगली दृष्टी असणे आवश्यक आहे. साधारणपणे, मांजर आणि त्या प्रजातीमधील प्राण्यांचे डोळे काळोखात चमकतात. यामध्ये मांजर, सिंह, चित्ता आणि वाघ या प्राण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
प्राण्यांचे डोळे माणसांपेक्षा वेगळे असतात
रिपोर्टनुसार, प्राण्यांच्या डोळ्यांची बाहुली (Eye Pupil) माणसांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांपेक्षा 50 टक्के मोठ्या असतात. अंधारात या प्राण्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या अधिक मोठ्या होतात. या प्राण्यांचे डोळे प्रकाशाला मानवांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. मानवाच्या तुलनेत प्राण्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह पेशी म्हणजे प्रकाश संवेदनशील पेशी जास्त असतात, यांना रॉड्स असे म्हणतात. या सेल्समुळेच प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात. या रॉड्स नावाच्या पेशींमुळे प्राणी अंधारात मानवांपेक्षा अधिक स्पष्टपणे पाहू शकतात.
प्राण्यांचे डोळे कसे चमकतात?
प्राण्यांच्या डोळ्यांच्या रेटिनाच्या मागे टेपेटम ल्युसिडम नावाचा एक टिशू (Tissue) असतो. त्याला आयशाइन असेही म्हणतात. हा टिशू मानवी डोळ्यांमध्ये नसतो. या टिश्यूचे काम प्रकाश प्राप्त करणे आणि त्याचे सिग्नलमध्ये रूपांतर करून मेंदूला पाठवणे आहे. त्यामुळे मेंदू अंधारात दिसणार्या गोष्टींचे स्पष्ट दिसू शकतात. या टिश्यूमुळे प्राण्यांचे डोळे अंधारात चमकतात.
मांजरीच्या डोळ्यातील टेपेटम ल्युसिडम टिश्यू क्रिस्टल सारख्या पेशींनी बनलेला असतो. त्यामुळेच तो प्रकाश एका काचेसारखा परावर्तित करून रेटिनाकडे परत पाठवतो. त्यामुळे प्राण्यांना सर्व काही स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे सर्व प्राण्यांचे डोळे चमकत नाहीत. पाळीव कुत्र्यांमधील अनेक जाती आहेत ज्यांचे डोळे कालांतराने ही शक्ती गमावतात. माशांचे डोळेही असेच असतात, कारण त्यांना पाण्याच्या आतील अंधारातही पहावे लागते.