नवी  दिल्ली :  अधिक पगारासह चांगल्या सुविधाही मिळतील, अशी नोकरी करणे हे तरुण-तरूणीचे  स्वप्न असते. पैशांसोबतच तुम्हाला  मान-सन्मान मिळेल अशी नोकरी मिळवण्यासाठी सर्वांची घडपड सुरू असते.  मात्र चायनामधील  तरूण मात्र चांगल्या पगाराची व्हाईट कॉलर  नोकरी सोडून वेटर आणि सफाई कामगाराची नोकरी स्विकारत आहे. एवढच नाही तर ही नोकरी करत असताना आम्ही खूश असून समाधानी असल्याचे देखील  हे तरूण म्हणत आहे.याचे कारण ठरला आहे  ‘My First Physical Work Experience’ हा हॅशटॅग.. चीनमधील मोठा तरूण वर्ग या हॅशटॅगशी जोडला गेला असून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे.  


चीनमधील तरूण य हॅशटॅगवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत. बिजनेस इनसाइडरने दिलेल्या माहितीनुसार, 12 जून पर्यंत या हॅशटॅगला तीन कोटी लोक जोडले गेले आहे. रिपोर्टनुसार एक वर्षापासून तरूणांमध्ये हा बदल दिसत आहे. या ट्रेंडच्या मागे एक जुनी कथा आहे. या कथेनुसार कॉन्ग यिजी नावाचा व्यक्ती पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर देखील त्याच्याकडे व्यवहारिक ज्ञान नसते. मात्र पदवी आणि पदवीनंतर त्याला मिळालेला गाऊन यामुळे  कॉन्ग यिजीला खूप सन्मान मिळतो. त्यामुळे यिजी रोज हा गाऊन घालून फिरत असे. त्याने कधीच तो गाऊन काढला नाही. आजही जगभरातील विद्यापीठामध्ये पदवीप्रदान सोहळ्यात गाऊन घातला जातो. या ट्रेंडला संपवण्यासाठी आणि कॉन्ग यिजीचा गाऊन उतरवण्यासाठी देखील हा ट्रेंड सुरू करण्यात आल्याचे म्हटले जाते. 


या ट्रेंडनुसार तरूण व्हाईट कॉलर जॉब म्हणजे जी नोकरी हुशार, इंटेलेक्च्युअल लोकांसाठी असते. ती नोकरी सोडून जिथे डिग्रीची गरज नसते अशी नोकरी स्विकारत आहे.  इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवर कॅप्शन लिहिले आहे, "नोकरी सोडल्यानंतर तरूण फास्ट फूड रेस्टॉरंट सुरू करत आहे. सफाई कामगार बनत आहे, ज्या नोकरीमध्ये जास्त बुद्धीचा वापर केला आहे. अले करत तरूण आपले  आयुष्य आपल्या पद्धतीनुसार जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे." तर दुसऱ्या महिलेने लिहिले आहे की, मी बाईट डान्समध्यो नोकरी करत होते. परंतु ही नोकरी आता मी सोडली आहे. कंपनी सोडल्यानंतर मी खूश आहे.  आता मला महिन्याच्या रिपोर्टसची चिंता करण्याची गरज नाही. मी फक्त माझ्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवते आणि विकते. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,  ती तिच्या रेस्टॉरंटमध्ये दररोज 140 डॉलर्स म्हणजेच सुमारे 11,000 रुपये कमवते. कामामुळे मुझे शरीर थकते परंतु मी  आनंदी आहे. 


तर दुसऱ्या एका महिलेने लिहिले की,  मी माझी  उच्च पगाराची सल्लागार नोकरी सोडली. नोकरीसोबतच इमेल, मुलाखती आणि पीपीटीच्या मागे धावणे हा सर्व ताण गेला आहे. आता मी  एका कॉफी शॉपमध्ये काम करते, जिथे मला अगोदरच्या नोकरीपेक्षा कितीतरी पट कमी पगार मिळतो. परंतु अगोदरच्या नोकरीपेक्षा मी आता जास्त आनंदी आहे. काम करताना मला कामाचा स्ट्रेस जाणवत नाही.  शेवटी काय तर तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला आनंद मिळतोय की नाही हे महत्त्वाचे आहे. जर तुमचे काम तुम्हाला आनंद देत असेल तर तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करत आहात याने काही फरक पडत नाही.


हे ही वाचा :