Howrah Bridge Interesting Fact : भारतावर इंग्रजाचं राज्य होतं, त्याकाळात इंग्रजांनी देशात विविध वास्तू बांधल्या होत्या. यामधील अनेक वास्तू आजतायगत उत्तम स्थितीत आहे. यापैकी अनेक ब्रिटीशकालीन वास्तू जगभरात प्रसिद्धही आहे. यातील एक म्हणजे भारतातील एक पूल. पश्चिम बंगालमधील हावडा पूल हा ब्रिटीशकालीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे. अनेकांना माहित नसेल की हा पूल फक्त दोन खांबावर बांधण्यात आला असून हा तयार करताना नट किंवा बोल्टचा वापर करण्यात आलेला नाही.


80 वर्षांपूर्वीचा भारतातील महाकाय ब्रीज


कोलकाता येथील हावडा ब्रिज हा पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर बांधलेला कॅन्टिलिव्हर पूल (Cantilever Bridge) आहे. हा ब्रीज देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. कोलकाताच्या पर्यटनाच्या दृष्टीनेही हा पूल फार महत्त्वाचा असून हे येथील मुख्य आकर्षण आहे. हावडा ब्रीज पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे दाखल होतात. विशेष म्हणजे हावडा ब्रिज दररोज रात्री 12 वाजता काही काळासाठी बंद केला जातो. अगदी ब्रिटीश काळापासून असं केलं जात असून हे आजतागायत कायम असून यामागचं कारण काय आहे जाणून घ्या...


नट-बोल्टचा वापर नाही


हावडा ब्रिज कॅन्टिलिव्हर पूल आहे. हावडा ब्रीज दररोज रात्री 12 वाजता काही काळासाठी बंद केला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, येथील स्थानिक लोकांच्या माहितीप्रमाणे रात्री 12 वाजता हा हावडा ब्रिज तुटण्याचा धोका असतो. यामागची सत्यता काय आणि हावडा ब्रिज रात्री बंद करण्यामागचं खरं कारण काय, या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.


हावडा ब्रिज नेमका बांधला कसा?


हा पूल ब्रिटिशांनी बांधला असून तो वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या पुलाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. हावडा ब्रिजवर दररोज रात्री 12 वाजता काही काळासाठी गाड्या, कार आणि बोटींना बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटिशांनी हा पूल केवळ दोन खांबांवर उभा केला. हा पूल केवळ 280 फूट उंचीच्या दोन खांबांवर उभा आहे. या दोन खांबांमधील अंतर दीड हजार फूट आहे. पुलावर अधिक वजन असल्यास तो कोसळू शकतो.


12 वाजता पूल बंद करण्याचं कारण काय?


हा पूल बांधणाऱ्या इंजिनियर्सने सांगितलं होतं की, या पुलाचे खांब जर पडले तर 12 वाजताच पडतील. ही मिथ्य जगभरात खूप लोकप्रिय आहे. कोलकात्यात गेलात तर तुम्हाला तिथेही हे ऐकायला मिळेल.