Swimming Pool : जेव्हा तुम्ही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाता किंवा वॉटर पार्कमध्ये जाता तेव्हा स्विमिंग पूलमध्ये एक गोष्ट कॉमन असते आणि ती म्हणजे त्यातील निळ्या रंगाच्या टाईल्स (Blue Colour Tiles). आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जगभरात स्विमिंग पूलच्या टाईल्सचा रंग फक्त निळाच का असतो? हा रंग पिवळा, केशरी, हिरवा किंवा लाल रंगाचा का नसतो? तर, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे हे कारण नेमकं कोणते ते जाणून घ्या. 


विज्ञानानुसार 'हे' आहे कारण


केंब्रिज युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. पॉल कॉक्सन यांच्या मते, स्विमिंग पूलमध्ये निळ्या रंगाच्या टाईल्सचा वापर केला जातो कारण सूर्यप्रकाश पांढरा असतो आणि तो स्पेक्ट्रमच्या सर्व विविध रंगांनी बनलेला असतो, त्यामुळे जेव्हा तलावाच्या पाण्यात प्रकाश पडतो तेव्हा निळा रंग आणखी बाहेर येतो. जेव्हा तुमच्याकडे ग्लासमध्ये पाणी असेल आणि त्यावर सूर्यप्रकाश पडेल तेव्हा ते रंगहीन दिसेल. परंतु, हे पाणी मोठ्या भागात जमा होऊन त्यावर सूर्यप्रकाश पडताच तुम्हाला ते निळ्या रंगाचे दिसेल. रेणू स्पेक्ट्रम हा प्रकाशाच्या लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांचा बनलेला असतो. जेव्हा तो पाण्यात पडतो तेव्हा त्यातून लाल रंग बाहेर पडतो, त्यामुळे पाण्यामधून परावर्तित होणारा प्रकाश थोडासा निळा दिसू लागतो.


सोप्या भाषेत समजून घ्या


खरंतर स्विमिंग पूलमध्ये निळ्या रंगाऐवजी इतर कोणत्याही रंगाच्या टाईल्स लावल्या तर त्यावर सूर्यप्रकाश पडताच पाणी हलकेसे तपकिरी किंवा घाणेरडे दिसू लागते. असं का होतं हे आपण विज्ञानाच्या भाषेत समजून घेतलं आहे. यामुळेच जगभरातील सर्व स्विमिंग पूलमध्ये निळ्या रंगाच्या टाईल्स लावण्यात आल्या आहेत, जेणेकरुन त्यामध्ये आंघोळ करणाऱ्या लोकांना स्वच्छ पाणी दिसू शकेल.


गडद रंगाच्या टाईल्स बसवल्यास काय होईल?


जर तुम्ही त्यात कोणत्याही गडद रंगाच्या टाईल्सचा वापर फॅशनसाठी किंवा तुमचा पूल अधिक चांगला दिसण्यासाठी, अगदी गडद लाल किंवा ग्रेफाइट काळ्या टाईल्सप्रमाणे केला असेल, तर तुम्हाला पूलचा वरचा भाग पाहावा लागेल. पाण्याच्या खोलीचा अंदाज घेता येणार नाही. आणि तुम्ही गंभीर जखमी देखील होऊ शकता. हे विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक आहे. म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये हलक्या निळ्या रंगाच्या टाईल्स वापरतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


Cat Temple : भारतातील 'या' मंदिरात केली जाते मांजरीची पूजा, 1000 वर्ष जुनी परंपरा; कारण माहितीय?