Two Way Mirror : आपल्या आजूबाजूला काचेचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. काही काचा रंगीत आणि डिझाइन केलेले असतात. तर काही काचा पारदर्शक असतात. अशा काचेचा वापर घरातील भांडी, बाटल्या, खिडकीच्या काच बनवण्यासाठी केला जातो. आरसा देखील काचेपासूनच बनवला जातो.


आरसा दोन प्रकारचा असतो. आरशाचा पहिला प्रकार म्हणजे साधा पारंपरिक आरसा याला वन वे मिरर (One Way Mirror) असं म्हणतात. हा आरसा प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतो. तर आरशाचा दुसरा प्रकार म्हणजे टू वे मिरर (Two Way Mirror) आहे. या आरशामध्ये एका बाजूने तुम्ही साध्या आरशाप्रमाणे तुमचा चेहरा पाहू शकता, तर दुसऱ्या बाजूला हा आरसा एखाद्या सामान्य काचेसारखा दिसतो. ज्यामधून काचेच्या पलिकडचं सर्व पाहू शकता. टू वे मिररचा चुकीचा वापर करत एमएमएस बनवण्याचे प्रकार समोर आले आहेत. जाणून घ्या टू वे मिरर आरसा वन वे मिररपेक्षा कसा वेगळा आहे? ते जाणून घ्या


आरसा कसा बनवला जातो?


रोबोटिक सिस्टिमच्या साहाय्याने एक मोठी काच कन्व्हेयर बेल्टपर्यंत नेला जातो. यानंतर, ही काच गरम पाणी किंवा ऑक्साईडचा वापर करुन स्वच्छ केली जाते. यानंतर, काचेवर प्रथम लिक्विफाइड टिनचा लेप दिला जातो. यामुळे चांदी काचेवर सहजपणे चिकटते. त्यानंतर यावर काही रसायनांचा वापर करुन काचेवर द्रवरूपातील चांदीचा मुलामा चढवला जातो. यानंतर काच अधिक काळ टिकावी यासाठी त्याच्यावर तांब्याचा मुलामा दिला जातो. मग आरसा 31 अंश सेल्सिअस तापमानात ड्रायरमध्ये सुकण्यासाठी ठेवला जातो. यानंतर मागील बाजूला एक पेंट लावला जातो आणि तो मशीनद्वारे वाळवला जातो.


टू वे मिरर कसा ओळखाल?


आजकाल मॉल्स किंवा हॉटेल्ससारख्या ठिकाणी टू वे मिररचा गैरवापर होताना पाहायला मिळतो. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ट्रायल रूम किंवा हॉटेल रूममध्ये टू वे आरसे सापडले आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही टू वे आरसा कसा शोधू शकता हे जाणून घ्या


फिंगर टेस्ट


यासाठी आरशावर बोट ठेवा. जर तुमचे बोट आणि त्याची प्रतिमा यामध्ये अंतर असेल तर आरसा साधा आहे. पण, जर तुमची बोट आणि तिची प्रतिमा एकमेकांना स्पर्श करत असेल तर लगेच समजून घ्या की हा टू वे मिरर आहे.


फ्लॅश लाइट टेस्ट


मोबाईलची फ्लॅश लाइट लावून सामान्य आरशात पाहिल्यास प्रकाश परावर्तित होतो. पण टू वे मिररमध्ये फ्लॅश परावर्तित होत नाही. अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता की, हा टू वे मिरर आहे


नॉक टेस्ट


जर आरसा ठोठावताना सामान्य ठक-ठक असा आवाज आला तर तो आरसा सामान्य आहे. पण जर आरसा ठोठावताना आवाजात प्रतिध्वनी येत असेल तर समजून घ्या की हा टू वे मिरर असून तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.


आरशात जवळून पाहा


कधी कधी अगदी बारकाईने पाहिल्यावर ते 'टू वे मिरर' पलिकडचंही दिसतं. अशा परिस्थितीत ट्रायल रुममध्ये तुम्हाला आरशात तपासायचा असेल तर, त्या आरशामध्ये अगदी जवळून पाहा आणि पलिकडचं काही दिसत का याचं निरीक्षण करा.