Viral Video : सध्या लग्नसराईचे (Wedding Season) दिवस सुरू आहेत, अशा दिवसात जिकडे-तिकडे लग्नाचा उत्साह आहे. अशातच सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे जबरदस्त व्हिडीओ (Viral Video) पाहायला मिळत आहेत. नेटकरी विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडीओ मोठ्या उत्सुकतेने पाहणे पसंत करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. जो थोडा हटके आहे, कारण येथे एक वर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
लग्नाची मिरवणूक सोडून नवरा बसला आंदोलनाला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ उत्तराखंडचा आहे. प्रत्यक्षात काठगोदाम हैदाखान रस्ता हा गेल्या महिन्यात दरड कोसळल्याने खचला होता. अशा परिस्थितीत रस्त्याच्या बांधणीसाठी स्थानिक जनता आणि काँग्रेस नेते आंदोलन करत होते. या दरम्यान, वराची लग्नाची मिरवणूक निघाली होती. रस्त्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याचे पाहून वराने वधूच्या घरी जाण्याऐवजी तेथेच आंदोलन करत बसणे पसंत केले आणि आंदोलनकर्त्यांसोबत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.
लग्नाच्या बोहल्यावर नवऱ्याने ठेवली अनोखी अट
आश्चर्याची बाब म्हणजे ही मिरवणूक सोडून नवरा चक्क राजकीय आंदोलनाला बसला आणि जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत या आंदोलनावर बसणार असल्याचे त्याने ठणकावले. हा व्हिडीओ काँग्रेस नेते यशपाल आर्य यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओला शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'भाऊ, तुम्ही जर आंदोनलाना बसलात तर लग्न चुकेल.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'हे घ्या भाऊ, त्याने लग्नाआधीच विरोध करायला सुरुवात केली...' आपले लग्न खास बनवण्यासाठी काय करतील हेच लोकांना भान नाही.'' याशिवाय इतरही अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इतर बातम्या
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, आणि राहुल गांधींचे 'फ्लाइंग किस'! व्हिडीओ व्हायरल