Bharat Jodo Yatra : राजस्थानमध्ये (Rajasthan) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज तिसरा दिवस आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास या यात्रेला सुरुवात झाली. 7 वाजेपर्यंत यात्रेने सुमारे 5 किलोमीटरचा प्रवास केला होता. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. अशातही राहुल गांधी काही आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे.


 


 






 


राहुल गांधींचे आनंदाचे क्षण


राहुल गांधी यांनी यात्रे दरम्यान फुटबॉल विश्वचषक सामन्याचा आनंद लुटला. हा सामना त्यांनी मोठ्या पडद्यावर पाहिला. काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये असून कोटा येथे ते फिफा वर्ल्ड कपचा आनंद लुटताना दिसले. राहुल गांधी यांचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी मोठ्या स्क्रीनवर मोरोक्को विरुद्ध स्पेन यांच्यातील फुटबॉल सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर नेतेही उपस्थित होते. येथे मोठ्या ठिकाणी मोठा स्क्रीन लावून हा सामना पाहण्यात आला. या व्हिडिओमध्ये काही लोक मैदानावर बसून सामन्याचा आनंद लुटत आहेत.



मोदी-मोदीच्या घोषणेवर राहुल गांधींचे फ्लाईंग किस..!


राजस्थानच्या झालावाडमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, यावर राहुल गांधींनी फ्लाईंग किस देत त्यांना अनोख्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. यापूर्वी मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातूनही अशी घटना समोर आली होती. मोदी-मोदीचा नारा येताच राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी सर्वप्रथम या लोकांना यात्रेत सामील होण्यास सांगितले, मात्र ते सहभागी झाले नाहीत तेव्हा राहुल यांनी त्यांना फ्लाइंग किस दिली.


 पुढील दोन आठवडे राजस्थानमध्ये
काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुढील दोन आठवडे राजस्थानमध्ये राहणार आहे. येथे यात्रा एकूण 7 जिल्हे फिरणार आहे आणि एकूण 520 किमी अंतर कापेल. दौसा येथे 13 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. 12 व्या दिवशी प्रवासाला विश्रांती मिळेल. सवाई 11 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान टोंकला स्पर्श करत माधोपूर जिल्ह्यात पोहोचेल. कोटा-बुंदी हा 7 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत 4 दिवसांचा प्रवास होणार आहे. राजस्थानच्या एकूण 7 जिल्ह्यांमध्ये 520 किलोमीटरचा प्रवास करून अलवर मार्गे हरियाणात प्रवेश करेल.


 


इतर बातम्या


Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, आणि राहुल गांधींचे 'फ्लाइंग किस'! व्हिडीओ व्हायरल