Why is Separation Marriage : भारतात (India) लग्न (Marriage) म्हटलं की, दोन व्यक्ती संपूर्ण आयुष्य एकत्र घालवणं, असा अर्थ होतो. दोघांनाही आपले संपूर्ण आयुष्य एका छताखाली एकमेकांसोबत घालवणे, सुख-दु:खात साथ देणे म्हणजे लग्न. लग्न म्हणजे काय विचारलं तर, भारतातील जवळपास 90 टक्के लोक अशीच उत्तरे देतील. पण, वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाचा अर्थ वेगळा आहे. बहुतेक देशांमध्ये लग्नाचा अर्थ, संस्कृती, सामाजिक व्यवस्था, चालीरीती आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. सध्या आशियाई देश जपानमध्ये लग्नाबाबत 'सेपरेशन मॅरेज' (Separation Marriage) म्हणजेच 'वीकेंड मॅरेज'चा (Weekend Marriage) नवा ट्रेंड सुरू आहे. तुम्हाला माहित आहे का विभक्त विवाह म्हणजे काय, जे जपानमधील विवाहित जोडप्यांना खूप आवडते?


विभक्त विवाहाचा वाढता ट्रेंड


जपानमध्ये सध्या विभक्त विवाहाचा (Separation Marriage) नवा ट्रेंड सुरु आहे. विभक्त विवाह पद्धती पती-पत्नीसाठी आनंदाचा उत्तम मार्ग मानला जात आहे. जपानमधील काही लोक विभक्त विवाहाला 'वीकेंड मॅरेज' (Weekend Marriage) असंही म्हणतात. यामध्ये लग्नानंतरही पती-पत्नीमध्ये अविवाहित असल्याची भावना कायम राहते. जपानच्या लोकांचा असा विश्वास आहे की, विभक्त विवाहामध्ये विवाहित जोडपे एकमेकांच्या भावना आणि आदराची जास्तीत जास्त काळजी घेतात. इतकेच नाही तर या लग्नात पती-पत्नीचा एकमेकांवरचा विश्वासही सामान्य लग्न पद्धतीपेक्षा जास्त असतो.


सेपरेशन मॅरेज किंवा वीकेंड मॅरेज म्हणजे काय?


जपानमध्ये विभक्त विवाह किंवा वीकेंड मॅरेजच्या वाढत्या ट्रेंडमध्ये विवाहित जोडपे एकाच घरात राहत असले तरीही एकाच खोलीत झोपत नाहीत. काही जोडपी विभक्त विवाहानंतर स्वतःच्या स्वतंत्र घरात राहतात. त्याच वेळी, काही लोक एकाच शहरात किंवा सोसायटीत किंवा एकाच टाऊनशिपमध्ये राहूनही रोज भेटत नाहीत. हा ट्रेंड भारतीयांना लोकांना अगदी विचित्र वाटू शकतो, पण जपानमध्ये अशा विवाहांचं प्रमाण वाढत आहे. गेल्या काही वर्षात जपानमध्ये विभक्त लग्न करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली आहे.


जोडपे एकत्र राहत नाहीत


विभक्त विवाह केलेले जोडपे एकाच घरात राहूनही एकाच खोलीत झोपत नाही. काही जोडपी विभक्त विवाहानंतरही वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहतात. काही कपल्स एकाच शहरात किंवा सोसायटीत राहतात. असं असलं तरी त्यांची रोज भेट होत नाही. 


विभक्त विवाहात जोडप्याचं एकमेकांवर प्रेम नसते?


आता तुम्हाला वाटत असेल की, विभक्त विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये प्रेम किंवा भावनिक जोड नसते, पण असं मूळीच नाही. अशा जोडप्यांमध्ये, सामान्य वैवाहिक जीवनातील पती-पत्नीसारखे संपूर्ण भावनिक बंधन आणि प्रेम असते.


याचं कारण काय?


जपानमधील तरुणांच्या मते, पती-पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत असले तरी, बहुतेक जोडप्यांच्या जीवनशैलीत खूप फरक असतो. अनेक वेळा पत्नी सकाळी 5 वाजता उठते, तर नवऱ्याला सकाळी 9 वाजेपर्यंत झोपण्याची सवय असते. जपानमध्ये एखाद्याची झोपे खराब करुन त्याला त्रास देणं अत्यंत वाईट मानलं जात. अशा परिस्थितीत वेगळे राहिल्यामुळे पती-पत्नीला एकमेकांच्या सवयींनुसार जुळवून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. यामुळे त्यांचे नाते घट्ट होते, असं जपानमधील लोक मानतात.


विभक्त विवाहाचे काय फायदे 


काही जपानी लोकांनी वीकेंड विवाह किंवा विभक्त विवाह केले आहेत. ही जोडपी त्यांच्या पार्टनरला म्हणजे पत्नी किंवा पतीला आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच भेटतात. यामुळे लग्नानंतरही त्यांचं स्वातंत्र्य कायम राहते. विभक्त विवाहात पती-पत्नीचा एकमेकांवरचा विश्वास सामान्य विवाहित जोडप्यांपेक्षा जास्त असतो, असं जपानी लोक म्हणतात. जे लोक विभक्त विवाह करतात त्यांचा एकमेकांवर आंधळा विश्वास असतो आणि ते एकमेकांचा आदर करतात.


विभक्त विवाहाचे तोटे


विभक्त विवाहात पत्नीला मुलांचे संगोपन एकटेच करावं लागतं. लग्नानंतरही पतीला कपडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत घरातील सर्व कामे स्वतः करावी लागतात. पती असूनही महिलांना खर्चासाठी स्वत: पैसे कमवावे लागतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Facts : इकडे एक सांभाळता येईना, तिकडे दोन लग्नाची अट; 'या' देशात दोन लग्न करणं बंधनकारक, अन्यथा जन्मठेप