10 Ft Tall Human Skeleton Found : पौराणिक कथांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की, एके काळी खूप उंच मानव (Human) पृथ्वीवर (Earth) असित्वात होते. हे वर्षानुवर्षे करण्यात येतात, पण आता हे दावे खरे असल्याचं सिद्ध करणारे अनेक पुरावे सापडले आहेत. पुरातत्व वैज्ञानिकांना अतिशय उंच अशा उंचीने मानवी सांगाडे सापडले आहे. अमेरिकेतील (America) गुहेमध्ये (Cave) शास्त्रज्ञांना 10 फूट आणि त्याहून जास्त उंची असलेले मानवी सांगाडे सापडले आहेत. अमेरिकेतील नेवाडा राज्यातील एका गुहेत पुन्हा पुरातत्व शास्त्रज्ञांना विचित्र मानवी अवशेष सापडले आहेत. हे विचित्र यासाठी कारण या मानवी सांगाड्यांची उंची सर्वसामान्य मानवापेक्षा खूप जास्त आहे. त्यातील काही सांगाडे 10 फूट उंचीचे सांगाडे आहेत. 


10 फूट उंच आणि लाल केस


सर्वसाधारणपणे माणसाची उंची 5 ते 6 फूट असते, यापेक्षा उंच लोक क्वचितच आढळतात आणि त्यातच 10 फूट खूप जास्त असतात, त्यामुळे 10 फूट उंचीचे मानवी अवशेष सापडणे, आश्चर्यकारक आहे. यामुळे पौराणिक कथांप्रमाणे आपल्या आधी उंच मानव पृथ्वीवर होते, या दाव्यांचा पुरावा सापडल्याचं मानलं जात आहे. या 10 फूट लांबीच्या मानवी सांगाड्यांवर लाल रंगाचे केस आढळले आहेत. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, 10 फूट उंच आणि लाल रंगाचे केस असलेली मानवांची एक प्रजाती दीर्घकाळ एकेकाळी अमेरिकेच्या नैऋत्य भागात वास्तव्यास होती, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हजारो वर्षांपूर्वी नेवाडा परिसरात राहणाऱ्या पायउट जमातीच्या मते, सी-ते-काह नावाचे काही लाल केसांचे नरभक्षक दूरच्या बेटावरून अमेरिकेत आले.


गुहेत पूर्वी सापडलेल्या विचित्र गोष्टी


हजारो वर्षांपूर्वी सी-ते-काह प्रजातीच्या मानवांनी रीड्सच्या तराफ्यावर समुद्र पार केला, असं मानलं जातं. हे नरभक्षक असून सामान्य माणसापेक्षा उंच, बलवान आणि क्रूर मानला जात असे. त्यानंतर, 1911 मध्ये, नेवाडामधील लव्हलॉक शहराजवळील एका गुहेत बॅट ग्वानो खतातील मुख्य घटकासाठी खोदत असताना काही खाण कामगारांना गुहेत अनेक विचित्र वस्तू आढळून आल्या, ज्यावर संशोधन करण्यात आलं.


15 इंच लांब सँडलही सापडले


यानंतर, 1912 मध्ये आणि पुन्हा 1924 मध्ये दोन अधिकृत उत्खनन सुरू झाले, ज्या दरम्यान गुहांमध्ये हजारो कलाकृती सापडल्या. यामध्ये लव्हलॉक जायंट्स नावाची ममीही आढळून आली होती. पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार, त्या ममीची उंची 8 ते 10 फूट दरम्यान होती. त्यांना 15 इंच लांबीच्या चपला देखील सापडल्या आणि दगडावर कोरलेली कोरीव काम हाताने केल्याचं आढळून आलं आहे.