Train Full Form : भारतातच काय तर जगभरात सगळेच ट्रेनने (TRAIN) प्रवास करतात. आपला प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि कमी वेळेत होण्यासाठी सर्वात आधी ट्रेनचाच विचार सर्वांच्या मनात येतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत धावणारी आणि मुंबईकरांचं सर्वात महत्त्वाचं प्रवासाचं साधन असणारी लोकल 'लाईफलाईन' म्हणून ओळखली जाते. पण, देशात प्रवासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ट्रेनचा फुल फॉर्म नेमका काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये देखील रेल्वेच्या फुल फॉर्म्सच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात. याच ट्रेनचा फुल फॉर्म नेमका काय? ते जाणून घेऊयात...    


खरंतर, सुरुवातीला आगगाडी, रेलगाडी, रेल्वेगाडी म्हटला जाणारा शब्द आता हळूहळू ट्रेन (TRAIN) या शब्दाने उच्चारला जाऊ लागला आणि तो सगळीकडे प्रचलित झाला.


ट्रेनचा फुल फॉर्म नेमका काय?


आगगाडीला इंग्रजीत 'ट्रेन' म्हणतात. तर, हिंदीत लोक रेलगाडी किंवा लोहपथगामिनी म्हणतात. पण TRAIN या इंग्रजी शब्दाचा फुल फॉर्म Tourist Railway Association Inc. असा आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये 'ट्रेन' म्हणतात. खरंतर, ट्रेन (TRAIN) हा शब्द देखील इंग्रजीतून घेतलेला नाही, तर तो फ्रेंच शब्द Trahiner पासून आला आहे. याचा अर्थ खेचणं किंवा लॅटिन भाषेत याला Trahere असं म्हणतात. 


रेल्वेशी संबंधित या शब्दांचे फुल फॉर्म काय?


आपण दिवसातून अनेक वेळा IRCTC हा शब्द वापरतो. पण तुम्हाला या शब्दाचा फुल फॉर्म माहीत आहे का? तर, IRCTC चा फुल फॉर्म Indian Railway Catering and Tourism Corporation असा आहे. त्याचप्रमाणे, IRFC चा फुल फॉर्म Indian Railway Finance Corporation असा आहे. तर, IRCON चा फुल फॉर्म Indian Railway Construction Limited असा आहे. आणि RVNL चा फुल फॉर्म Rail Vikas Nigam Limited या अर्थाने वापरला गेला आहे.


'हे' शब्दही रेल्वेशी संबंधित आहेत


रेल्वेशी संबंधित फक्त इतकेच शब्द नाही तर इतरही अनेक शब्द महत्त्वाचे आहेत. या शब्द कोणते आणि त्यांचे फुल फॉर्म्स काय ते जाणून घेऊयात. 


IR : Indian Railway


WL : Waiting List 


UTS : Unreserved Train Tickets


SBF : Staff Benifites Fund


RSWL : Road Side Waiting List


PQWL : Pooled Quota Waiting List


GNWL : General Waiting List


NTES : National Train Enquiry System


TQWL : Tatkal Quota Waiting List


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Electric Shock : एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यास कधी-कधी शॉक का लागतो? कधी विचार केलाय? जाणून घ्या वैज्ञानिक कारण