India: आजच्या या युगात असे फारच कमी लोक असतील जे कधीच कुणाच्या प्रेमात (Love) पडले नाहीत किंवा ज्यांचे कधीच कुणाशी प्रेमसंबंध (Relationship) राहिले नाहीत. आजकाल 14 ते 15 वयोगटातील मुलं देखील प्रेमात पडतात. एकदा 18 वर्षं पूर्ण झाली की त्यांचं नातं आणखी पुढच्या टप्प्यावर जातं.


नात्यातील प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबन घेणं (Kiss) किंवा मिठी मारणं (Hug) हे अगदी सामान्य झालं आहे. काही लोक परस्पर संमतीने शारीरिक संबंधही ठेवतात. पण अशा या युगात एक महिला अशीही आहे, जिने तिच्या 35 वर्षांच्या आयुष्यात कधी कुणावर प्रेम केलं नाही, ना तिला कधी कुणाचं चुंबन घेण्याची किंवा कुणाशी जवळीक साधण्याची इच्छा झाली.


नेमकं कारण काय?


या महिलेचं नाव अन्या पांचाळ असं आहे. अन्या म्हणते की, तिला पुरुषांशी बोलण्याची किंवा त्यांना भेटण्याची भीती वाटते. 35 वर्षात ती एकदाही कुणाच्या जवळ गेली नाही. ना कधी तिने कुणाशी प्रेमसंबंध ठेवले, ना कोणत्या पुरुषाचं चुंबन घेतले, ना कुणाला मिठी मारली. अन्या तिच्या आई-वडिलांसोबत राहते. ती म्हणते की तिला सोशल अँग्झायटी (Social Anxiety) आहे. तिला पुरुषांशी बोलण्याची, त्यांना भेटण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची किंवा पुरुषांसोबत कोणत्याही नात्यात येण्याची भीती वाटते.


पुरुषांशी बोलण्याचीही वाटते भीती


मिररच्या रिपोर्टनुसार, अन्या म्हणते की, रोमँटिक डेटवर जाणं तर खूप दूरची गोष्ट, तिला पुरुषांशी बोलायचीही भीती वाटते. या बाबतीत तिचा आत्मविश्वास (Confidence) खूप कमी आहे. तिचे जवळजवळ सर्व मित्र विवाहित आहेत आणि त्यांना मुलंही आहेत. पण ती अजूनही अविवाहित आहे. तिने आजपर्यंत कुणालाही किस (Kiss) केलेलं नाही, जसं चित्रपटांतील कपल्स अगदी सामान्यपणे करतात.


अन्याला एकटं राहणं खूप विचित्र वाटतं. अन्याच्या आई-वडिलांच्या लग्नाला देखील 40 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यांची तिच्याकडून एवढीच इच्छा आहे की, तिने तिच्या आवडीच्या व्यक्तीसोबत आनंदी राहावं.


भावनिक जवळीक साधण्याची इच्छा


ती पुढे म्हणाली की, तिला शारीरिक संबंधांपेक्षा भावनिक नातं (Emotional Connection) निर्माण करायचं आहे. मग यासाठी तिला कुणाला डेट करावं लागलं तरी चालेल. पण चिंतेची गोष्ट ही आहे की, जेव्हा जेव्हा तिच्या मनात एखाद्या पुरुषाला भेटण्याचा विचार येतो किंवा त्यांच्याशी बोलण्याचा विचार येतो तेव्हा ती घाबरून जाते.


बालपणामुळे मानसिक स्थिती बिघडली


सोशल अँग्झायटीने त्रस्त असलेल्या अन्यानेही यामागचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, तिच्या बालपणी तिला मारहाण केली जायची, तिला खूप ओरडा मिळायचा. त्यामुळे तिला लोकांमध्ये मिसळण्याची किंवा सोशल होण्याची भीती वाटू लागली. पुरुषांशी बोलताना तिला लाज वाटू लागली. यामुळेच तिला आता इतरांसारखं पबमध्ये जाण्यापेक्षा घरीच हलवा बनवून खाणं योग्य वाटतं. 


लाईफ एन्जॉय करण्याची अन्याची इच्छा


अन्याने सांगितले की हे सर्व 16 वर्षांच्या वयापासून सुरू झालं, जेव्हा तिने स्वतःला लोकांपासून पूर्णपणे वेगळं केलं. मात्र, आता तिला कुणाशी तरी तिच्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि कुणावर तरी प्रेम करायचं आहे. कारण पुढे म्हातारपणात तिला या गोष्टींचा पश्चाताप होऊ द्यायचा नाही की, तिने कधी तिचं आयुष्य एन्जॉय केलं नाही.


हेही वाचा:


VIDEO: मेट्रोमध्ये बसून मंच्युरियन खाणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जे झालं ते पाहाच