Viral Video: आजकाल सर्वच लोक काहीही खाण्याआधी स्वच्छतेची (Hygiene) काळजी घेतात. स्ट्रीट फूड खाताना लोक अधिक सावधगिरी बाळगतात. सोशल मीडियावर बऱ्याचदा असे व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खाद्यपदार्थ तयार करताना किती अस्वच्छता बाळगली गेली याचा अंदाज येतो.


बऱ्याच फॅक्टरीतील कामगार बरबटलेल्या हातांनी आणि पायांनीच पदार्थ बनवतात, हेच पदार्थ लोक नंतर मस्त चव घेऊन खातात. हे खाद्यपदार्थ कशा पद्धतीने बनवले जातात, याचा अंदाज कुणालाही नसतो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात फ्रूट केक (Fruit Cake) कसा बनवला जातो याची एक झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही फ्रूट केक खाताना 10 वेळा विचार कराल.


हात बुडवून बनवलं मिश्रण


व्हायरल व्हिडीओमध्ये फ्रूट केक कसा बनवला जातो याची झलक दाखवण्यात आली आहे. एक व्यक्ती केकसाठी मिश्रण तयार करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हे केकचं मिश्रण बनवताना कामगार कोणत्याही मशिनचा वापर करत नाही, तर तो स्वत:च बरबटलेल्या हाताने केकचं मिश्रण मिक्स करताना दिसत आहे.


हा कामगार अनेक अंडी फोडून बादलीत टाकत आहे, हाताने मिश्रण मिक्स करुन त्याच हाताने तो बटर मिक्स करत आहे. नंतर हाताला चिकटलेलं पीठ काढून त्याच बादलीत टाकतो.  हा सगळा किळसवाणा प्रकार पाहून फार विचित्र वाटतं. कारखान्यात फ्रूट केक कसा तयार केला जातो? हे तुम्ही देखील एकदा पाहाच...




लोकांनी दिल्या विविध प्रतिक्रिया


अस्वच्छ पद्धतीने केक बनवण्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप मनोरंजक कमेंट करत आहेत आणि केक खाण्याच्या शौकीन असलेल्या त्यांच्या मित्रांनाही टॅग करत आहेत. सध्या लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.


व्हिडिओ पाहून लोक म्हणतात, ही व्यक्ती या पिठात पूर्णपणे का बुडत नाही? lj एका व्यक्तीने लिहिलं की, आजपासून केक खाणे बंद करा... तर काही लोकांनी याचा आनंद घेताना असंही म्हटलं की, या व्यक्तीने स्वत:लाच केकमध्ये बुडवून घेतलं आहे. पिठाची चव आणखी गोडी केली आहे. एकाने म्हटलं, कामगाराच्या हाताद्वारे नैसर्गिक मीठ पिठात मिक्स होत आहे.


असा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही पाणीपुरी बनतानाचे, रेवाडी, गूळ बनवतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात लोक त्यांचे हात आणि पाय वापरून हे पदार्थ बनवताना दिसत होते.


हेही वाचा:


Rahul Gandhi: चप्पल पुसली ते भांडी धुतली, सुवर्ण मंदिरात राहुल गांधींकडून सेवा; 10 फोटोंना हजारो लाईक्स