Trending News: आपलं लग्न (Marriage) किंवा रिसेप्शन (Reception) भव्य पद्धतीने व्हावं, अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. लग्नाचं ठिकाण भव्य असावं, लग्नाचा हॉल शाही असावा, लग्नाचा सूट सुंदर असावा, अशी प्रत्येकाची स्वप्नं असतात. आता हे सगळं करण्यासाठी खर्चही तितकाच येणार हे सहाजिक आहे. जितका आलिशान हॉल, तितकीच त्याची किंमतही वाढते.


आता या सगळ्यातून इटलीतून एक अजबच प्रकरण समोर आलं आहे, जिथे एका भव्य रेस्टॉरंटमध्ये पाहुण्यांना रिसेप्शन पार्टी देऊन एक जोडपं बिल न भरताच फरार झालं आहे. या जोडप्याने बिल न भरताच पळून गेल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकाने केला आहे. यामुळे झालेलं नुकसान हे फार मोठं असून रेस्टॉरंट आता दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


नेमकं घडलं काय?


त्याचं झालं असं की, इटलीतील एका जोडप्याने फ्रोसिनोन प्रांतातील 'ला रोटोंडा सीफूड रेस्टॉरंट'मध्ये त्यांची रिसेप्शन पार्टी आयोजित केली.  40 वर्षीय मोरेनो प्रियोरती (Moreno Prioretti) आणि त्याची पत्नी आंद्रे स्वेन्जा (Andrae Svenja) यांनी पाहुण्यांना आमंत्रित केलं. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि यानंतर रेस्टॉरंटचं बिल न भरता जोडपं फरार झालं.


या जोडप्याचं म्हणणं आहे की, त्यांनी त्यांच्या 80 पाहुण्यांच्या जेवणाचं संपूर्ण बिल दिलं. तथापि, रेस्टॉरंटचे मालक एन्झो फॅब्रिझी (Enzo Fabrizi) म्हणाले की, रिसेप्शन पार्टीला आलेल्या पाहुण्यांचं एकूण बिल 8 लाख रुपये झालं, जे जोडप्याने भरलं नाही. 


बिल न भरता जोडप्यासह पाहुण्यांनी काढला पळ


बिल न भरताच हे जोडपं पळून गेल्याचं हॉटेल मालकाने सांगितलं. त्यांनी सांगितलं की, या जोडप्याने 2800 पौंडचं डिपॉझिट भरलं होतं. पार्टी सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ही रक्कम भरली होती. पण मूळ बिल हे 8000 पौंड झालं होतं, जे जमा केलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त होतं.


फॅब्रिझी म्हणाले की, सर्व पाहुण्यांनी जेवल्यानंतर आणि वाईनचा आस्वाद घेतल्यानंतर ते एकूण बिलाची रक्कम जमा करण्यासाठी तिथे गेले. मात्र बिल न भरताच या जोडप्यासह सर्व पाहुणे पळून गेल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला.


खटला मागे घेणार नाही


या घटनेनंतर जर्मन आणि इटालियन पोलिसांनी या जोडप्याला अटक करण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार, जोडप्याचं म्हणणं आहे की, त्यांनी संपूर्ण पैसे भरले आहेत. तर रेस्टॉरंट मालक फॅब्रिझींचं म्हणणं आहे की, त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत.


त्यामुळे पोलिसांत दाखल केलेली तक्रार ते मागे घेणार नाहीत. त्यामुळे पैसे मिळेपर्यंत खटला सुरू राहणार आहे. फॅब्रिझी म्हणाले की, या सर्व प्रकारामुळे त्यांचं रेस्टॉरंट दिवाळखोरीला देखील येऊ शकतं. कारण त्यांना आता अनेक कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागणार आहेत.


हेही वाचा:


Trending: ना कधी प्रेमात पडली... ना कधी कुणाला भेटण्याची इच्छा झाली; 'या' 35 वर्षीय महिलेला वाटते पुरुषांची भीती, सांगितलं धक्कादायक कारण