General Knowledge Quiz: गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, ब्रह्मपुत्रा, गोदावरी यासह अनेक नद्या भारतात वाहतात. पण तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का जिथे एकही नदी वाहत नाही? असे आणि अशाच अनेक प्रकारचे प्रश्न आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेले आहेत. जीकेपासून (GK) चालू घडामोडीपर्यंतचे प्रश्न परिक्षांमध्ये विचारले जातात. अशा अनेक संबंधित प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, जी तुम्हाला स्पर्धा परीक्षेत उपयुक्त ठरू शकतात.


1. प्रश्न- एकही ट्रॅफिक सिग्नल नसलेल्या देशाचं नाव सांगा?
उत्तर- भूतान हा असा देश आहे जिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही.


2. प्रश्न- असा कोणता देश आहे, ज्यातून एकही नही वाहत नाही?
उत्तर- सौदी अरेबिया हा असा देश आहे, जिथे एकही नदी वाहत नाही. याशिवाय येथे पाऊस खूप कमी पडतो.


3. प्रश्न- कोणत्या देशात एकही विमानतळ नाही?
उत्तर- व्हॅटिकन सिटीमध्ये एकही विमानतळ नाही.


4. प्रश्न- भारतातील कोणत्या नदीला एक नव्हे, तर दोन राज्यांची लाईफलाईन म्हणतात?
उत्तर- तिस्ता नदी ही सिक्कीमची सर्वात मोठी नदी आहे. ही नदी सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहते.


5. प्रश्न- कोणत्या नदीला लंडनची गंगा नदी म्हणतात?
उत्तर- थेम्स नदीला लंडनची गंगा म्हणतात.


6. प्रश्न- लाल किल्ला बांधायला किती वेळ लागला?
उत्तर- लाल किल्ला बांधायला दहा वर्षं लागली.


7. प्रश्न- तीन भाषांपासून बनलेले शहर कोणते?
उत्तर- अहमदाबाद हा मूळ शब्द संस्कृतमधून आला आहे. तर 'दा' हा शब्द इंग्रजीतून आणि 'बाद' हा हिंदीचा आहे.


8. प्रश्‍न- भारतात सर्वात जास्त खाल्लेले धान्य कोणते आहे?
उत्तर- भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे धान्य तांदूळ आहे.


9. प्रश्‍न- असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
उत्तर- सरडा.


10. प्रश्‍न- पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
 उत्तर- मज्जासंस्था.


11. प्रश्‍न- त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
उत्तर- मेलानिन.


12. प्रश्‍न- महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे?
उत्तर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


13. प्रश्‍न- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते?
उत्तर- रत्नागिरी.


14. प्रश्‍न- महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो?
उत्तर- आंबोली, सिंधुदुर्ग.


15. प्रश्‍न- भारतात किती सण आहेत?
उत्तर- 36 प्रमुख सण आहेत.


हेही वाचा:


Trending: ना कधी प्रेमात पडली... ना कधी कुणाला भेटण्याची इच्छा झाली; 'या' 35 वर्षीय महिलेला वाटते पुरुषांची भीती, सांगितलं धक्कादायक कारण