Weird News: जपानमधील बहुसंख्य लोक लग्न करत नाहीत आणि त्यामुळेच जपानची (Japan) लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. तरुणांची संख्या कमी होत असून वृद्धांची संख्या वाढत आहे, जी अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही. अशातही, जे लोक लग्न करत आहेत, ते अशा गोष्टींशी लग्न करत आहेत, जे अत्यंत विचित्र आहे आणि देशाला याचा काही फायदाही नाही. अलीकडेच एक जपानी माणूस एका कार्टून कॅरेक्टरच्या (Cartoon Character) इतका प्रेमात पडला की त्याने आधी त्या कार्टुनची माणसासारखी दिसणारी बाहुली बनवली आणि मग तिच्याशी लग्न (Marriage) केलं.


कोण आहे नेमका हा माणूस?


अकिहिको कोंडो (Akihiko Kondo) नावाचा हा माणूस बऱ्याच दिवसांपासून या कार्टून कॅरेक्टरच्या (Anime) प्रेमात होता. आता त्याने या कार्टूनमधील पात्राशी लग्नच केलं आहे आणि आजकाल तो एका नवीन प्रकारच्या नात्याचा प्रचार करत आहे. या नात्याचं नाव आहे 'फिक्टोसेक्शुअल', म्हणजेच असं नातं ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या काल्पनिक पात्राच्या प्रेमात पडते आणि तिच्यासोबत राहण्याचं स्वप्न पाहू लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकिहिको याने असं करण्यामागचं अचाट कारणही सांगितलं.


कार्टून कॅरेक्टरशी का केलं लग्न?


अकिहिको या जपानी व्यक्तीने सांगितलं की लोक त्याला वेडा, विचित्र आणि मानसिकदृष्टी आजारी व्यक्ती (Mental) म्हणायचे. या कारणामुळे त्याने 'फिक्टोसेक्सुअल असोसिएशन'ची सुरुवात केली, ज्याद्वारे त्याला लोकांना या नवीन प्रकारच्या नातेसंबंधाची (Relationship) माहिती देता येईल. सध्या त्याच्या या असोसिएशनमध्ये केवळ चार सदस्य आहेत. अकिहिकोचं असं म्हणणं आहे की, तो तर या कार्टुन पात्राच्या प्रेमात तर आहेच. परंतु, त्याला जगाला या नवीन प्रकारच्या प्रेमाबद्दल सांगायचं आहे आणि त्यामुळे त्याने या कार्टुन कॅरेक्टरशी लग्न केलं.






लग्नासाठी केले 13 लाख रुपयांहून अधिक खर्च


अकिहिको हे 40 वर्षांचे असून ते जपानी सरकारमध्ये (Japan Government) काम करतात. त्यांनी 2018 मध्ये कार्टून कॅरेक्टरच्या डॉलशी लग्न केलं. अकिहिकोने या लग्नासाठी 13 लाखांपेक्षा जास्त खर्च केला आहे. या विवाह सोहळ्याला एकूण 40 पाहुणे उपस्थित होते. पण त्याच्या आईवडिलांनी त्याच्या लग्नाला येण्यास नकार दिला, कारण त्यांना अशा लग्नात सहभागी व्हायचं नव्हतं. कोंडोला आता 'फिक्टोसेक्शुअल रिलेशनशिप'चा जनक मानलं जातं.


हेही वाचा:


World News: 17 बायका, 96 मुलं, तरीही भरलं नाही 'या' व्यक्तीचं मन; आता करु इच्छितो अनोखा विक्रम