उत्तर प्रदेश: सोशल मीडियावर (Social Media) नेहमी अशा अनेक बातम्या आणि व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात, ज्या ऐकून आणि पाहून लोकांना गंमत वाटते. तर काही वेळा व्हायरल होणाऱ्या घडामोडी या मन सुन्न करणाऱ्या असतात. असे अनेक व्हिडीओ दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून मन भांबावून जातं. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे, ज्याची सगळीकडे चर्चा आहे.


त्याचं झालं असं की, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अमरोहा जिल्ह्यातील एक कैदी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला, त्यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यातही यश तर आलंच. पण, जेव्हा पोलिसांनी त्याला पळून जाण्याचं कारण विचारलं तेव्हा कैद्याने सांगितलेलं कारण फारच भन्नाट होतं. आज याच गोष्टीची सर्वत्र चर्चा आहे.


पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न


अमरोहा जिल्ह्यातील एका कैद्याने पोलिसांच्या गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला जागीच थांबण्याची सूचना केली, तरीही तो पळतच सुटला होता. पोलिसांनी त्याच्या पायाला गोळी मारली, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं की, तू का पळत होतास? तर त्याने संपूर्ण हकिकत सांगितली.


तुरुंगात भेटायला येणारी बायको पडली दुसऱ्याच कैद्याच्या प्रेमात


कैदी वाजिद अली त्याच्या पत्नीला शोधायला निघाला होता, जी त्याच्या सोबतच तुरुंगात असणाऱ्या दुसऱ्या कैद्यासोबत पळून गेली होती. त्याने पोलिसांना सांगितलं की, तो जेव्हा मुरादाबादमधील तुरुंगात होता, त्यावेळी त्याची भेट रिजवान नावाच्या एका दुसऱ्या कैद्याशी झाली. या दरम्यान दोघांची घट्ट मैत्रीही झाली होती. वाजिदची पत्नी त्याला भेटायला नेहमी तुरुंगात जायची, या वेळी वाजिदने त्याचा नवा मित्र रिजवानची भेट पत्नीला करुन दिली. पण मित्रच आपला असा काटा काढेल, हे त्याला माहीत नव्हतं.


तुरुंगातील मित्रासोबतच पळून गेली बायको


कालांतराने वाजिदची पत्नी आणि रिजवान हे दोघे प्रेमात पडले, त्यानंतर रिजवान तुरुंगातून देखील सुटला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रिजवान आणि वाजिदच्या पत्नीची बाहेर पुन्हा भेट झाली आणि त्यानंतर ते दोघे पळून गेले. बरेच दिवस बायको भेटायला का नाही आली म्हणून वाजिदने चौकशी केली, त्यानंतर त्याला समजलं की ती रिजवान सोबत पळून गेली. यानंतर वाजिदने बदला घेण्याचं ठरवलं आणि त्याने पोलिसांच्या गाडीतून पळ काढला. पोलिसांनी वाजिदला लगेच ताब्यातही घेतलं, पण त्याने सांगितलेली ही रंजक गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.


हेही वाचा:


WWE Fighting: चक्क ट्रेनमध्येच झाली WWE सारखी फायटिंग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल