Volkswagen Polo Service : अलिकडेच बंगळुरूमध्ये (Bangalore) मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मुसळधार पावसानं बंगळुरुमधील रस्त्यांनाही नदीचं स्वरुप आलेलं. अशातच अनेकांच्या गाड्यांमध्ये पावसाचं पाणी गेल्यामुळे गाड्या बिघडल्या होत्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेकांनी गाड्या सर्व्हिसिंगसाठी कंपनीत पाठवल्या आहेत. याचसंदर्भातील एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


बंगळुरुमधील एका व्यक्तीनं कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आपली गाडी सर्व्हिसिंगसाठी पाठवली होती. पण गाडी सर्व्हिसिंग करुन आल्यानंतर ग्राहकाला जे बिल देण्यात आलं, ते पाहून तुम्हालाही धक्का बसले. गाडी सर्विसिंग केल्यानंतर ग्राहकाला तब्बल 22 लाख रुपयांचं बिल आकारण्यात आलं. यात महत्त्वाची बाब अशी की, ग्राहकानं जी गाडी सर्व्हिसिंगला पाठवलेली त्या गाडीचीच किंमतच 11 लाख रुपये आहे. म्हणजेच, ग्राहकाला गाडी सर्व्हिसिंगचं जे बिल आकरण्यात आलं आहे. त्या पैशांमध्ये दोन नव्या कोऱ्या गाडी येतील. 


काय आहे प्रकरण?


बंगळुरूमधील एक इंजिनिअर अनिरुद्ध, अॅमेझॉनमध्ये काम करतो. त्यानं ही घटना त्याच्या लिंक्डइन सोशल मीडिया प्रोफाइलवर शेअर केली आहे. ज्याला त्यानं 'क्रोनी कॅपिटलिझम' असं नाव दिलं आहे.


अनिरुद्ध हा फोक्सवॅगन पोलो टीएसआय कारचा मालक आहे आणि बंगळुरूमधील पुरात त्याच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर त्यांनी आपली कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीसाठी दिली. ही कार दुरुस्त करण्यासाठी 20 दिवस लागले. त्यानंतर त्यांला सर्विस सेंटरकडून कळवण्यात आलं की, त्याची गाडी दुरुस्त झाली आहे. त्यानंतर तो गाडी घेण्यासाठी सर्विस सेंटरमध्ये पोहोचला, त्यावेळी मात्र त्याच्या हातात तब्बल 22 लाखांचं बिल देण्यात आलं. या गाडीची मूळ किंमतच 11 लाख रुपये आहे. त्यानंतर या व्यक्तिनं इंशोरन्स कंपनीशी संवाद साधला.   


ग्राहकाचं म्हणणं काय? 


अनिरुद्धनं सोशल मीडिया अकाउंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. पोस्टमार्फत त्यानं सांगितलंय की, गाडीत बिघाड झाल्यानंतर जेव्हा गाडी घेण्यासाठी ते सर्विस सेंटरला पोहोचले. त्यावेळी त्याला इस्टीमेशन चार्ज म्हणून 44,840 रुपये देण्यासाठी सांगण्यात आलं. यासाठी 5 हजार रुपये आकारले जातात. तसेच, ज्या गाडीचे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी 44,840 रुपये चार्ज केले जात आहेत. तिची बाजारातील किंमत केवळ 6 लाख रुपये आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI