Dragon Viral Video : आकाशात डोळ्यादेखत उडणारा विशालकाय ड्रॅगन तुम्ही पाहिला आहे का? ड्रॅगन नाव तुम्ही ऐकले असेल किंवा अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही हा भयानक प्राणी पाहिला असेल. अशाच एका ड्रॅगनचा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.


लाखो वर्षांपूर्वी हे प्राणी अस्तित्वात?


 ड्रॅगन हा सापासारखा प्राणी एक काल्पनिक प्राणी आहे, ज्याला लांब शेपूट आहे, तसेच तो उडणारा प्राणी असून त्याच्या भयंकर तोंडातून आगही काढतो. या धोकादायक प्राण्याचा उल्लेख चीनच्या (China) लोककथांमध्येही आढळतो. असे मानले जाते की, लाखो वर्षांपूर्वी म्हणजेच हे प्राणी अस्तित्वात होते. मात्र, आजच्या युगातही काही वेळा लोक हा प्राणी पाहिल्याचा दावा करतात. याच्याशी संबंधित एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडीयावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्याचे सत्य जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.


 






 


हवेत उडणारा महाकाय ड्रॅगन


या व्हिडीओमध्ये एक महाकाय ड्रॅगन हवेत उडताना दिसत आहे आणि त्याचे मोठे तोंडही उघडण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टेडियमवर आकाशात उडणारा एक ड्रॅगन किती धोकादायक दिसत आहे. त्याचे सत्य हे आहे की तो खरा ड्रॅगन नसून तो हजार ड्रोनच्या मदतीने तयार करून हवेत उडवण्यात आला आहे. ड्रोन शोचे हे एक सुंदर दृश्य आहे, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. तुम्ही क्वचितच असा शो पाहिला असेल ज्यामध्ये शेकडो हजारो ड्रोन एकत्र वापरले गेले असतील.


1.5 कोटी वेळा पाहिला गेला व्हिडीओ


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TansuYegen या नावाने शेअर करण्यात आला आहे आणि 'जिओस्कॅन शोदरम्यान 1000 ड्रोनद्वारे बनवलेला ड्रॅगन' असे कॅप्शन लिहिले आहे. अवघ्या 5 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 15 दशलक्ष म्हणजेच 1.5 कोटी वेळा पाहिला गेला आहे, तर 19 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे.


नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया


व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहीजण हे अतिशय सुंदर दृश्य असल्याचे सांगत आहेत, तर काहींनी याला 'गेम ऑफ ड्रोन' असे नाव दिले आहे.


महत्वाच्या बातम्या :