PIB Fact Check of Aadhaar Card News: सोशल मीडियावर अनेकदा चुकीचे मेसेज, माहिती फॉरर्वड करण्यात येत असते. ती माहिती खरी आहे की खोटी, याचा विचारही न करता अनेकदा फॉरवर्ड केली जाते. अशानं लोकांमधील संभ्रम वाढतो. तसेच फसवणूकही होण्याची शक्यता असते. आधार कार्ड असणाऱ्यांना केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची मदत करणार असल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेजबाबात केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच, PIBने फॅक्ट चेक करत खुलासा केला आहे.


सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल त्याचा नेम नाही. जवळपास प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असतो. दिवसातून एकदा तरी तो सोशल मीडियावर जातोच. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणारे मेसेज सर्व खरे असतील असं नाही. अनेकदा सरकारच्या योजनाबाबतचे (Government Scheme) मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशावेळी त्याची पडताळणी न करता ते फॉरवर्ड केले जातात. अशामुळे अनेकदा फसवणूक होते, तसेच संभ्रम निर्माण होतो. आधार कार्ड असणाऱ्यांना सरकार आर्थिक मदत करणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  सरकारी अपडेट या यूट्यूब चॅनलवरून हा मेसेज व्हायरल होत आहे. त्यात असा दावा करण्यात आला की, आधार कार्ड असणाऱ्यांना केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. जर तुमच्याकडे हा मेसेज आला असेल तर विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घ्या...


PIB ने सांगितलं सत्य -


प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच, PIB (Press Information Bureau) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजचं फॅक्ट चेक करतं. आधार कार्डवर तीन हजार रुपये मिळणाऱ्या दाव्याचेही पीआयबीने फॅक्ट चेक केलेय. त्यामध्ये असं समोर आलेय की, हा दावा पूर्णपणे फर्जी आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणताही योजणा चालवली जात नाही. असा मेसेज, व्हिडीओ अथवा इतर काही तुमच्याकडे आलं तर त्यावर विश्वास ठेवू नका. तसेच हा मेसेज फॉरर्वडही करु नका, असे आवाहन पीआयबीनं केले आहे. 






सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट मेसेजवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. तसेच असे मेसेज फॉरवर्ड करणेही टाळा... महत्वाचं म्हणजे, कुणासोबतही बँक डिटेल्स, अकाउंट क्रमांक, ओटीपी, सीव्हीव्ही क्रमांक, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड याची माहिती शेअर करु नका...  पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही व्हायरल मेसेज अथवा व्हिडीओवर विश्वास ठेवू नका.