Viral Video: जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन कुठेही जात असाल तर त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवा. कारण अनेक वेळा मुलं (Child) अशा काही खोड्या करतात, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. निजामाबाद येथील  एका चार वर्षीय चिमुकलीचा फ्रीज उघडताना विजेचा धक्का दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. आपल्या वडिलांसोबत सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी गेली असताना तिला चॉकलेट घ्यावसं वाटलं. वडिलांचं लक्ष नसताना ती फ्रिजकडे गेली आणि फ्रिजचा करंट लागून तिचा मृत्यू झाला.


घटनेचा व्हिडीओ व्हायरल


हा व्हिडिओ तेलंगणातील निजामाबाद येथील नंदीपेठ भागातील एका सुपरमार्केटचा आहे. या सुपरमार्केटमध्ये गेलेली एक छोटी मुलगी फ्रीजमधून चॉकलेट्स काढायला जाते आणि चॉकलेट्स काढत असताना अचानक तिला विजेचा धक्का बसतो. 


विजेचा धक्का लागल्याने ही मुलगी मागे लटकली. शेजारी उभ्या असलेल्या वडिलांच्या ही घटना लक्षात आली नाही. कारण ही संपूर्ण घटना अतिशय शांततेत घडली. मुलीने असे कोणतेही संकेत दिले नाहीत, ज्याद्वारे तिच्या वडिलांना काही कळेल.


नेमकं घडलं काय?


मिळालेल्या माहितीनुसार, नंदीपेठ येथील एका सुपरमार्केटमध्ये राजशेखर हे त्यांची 4 वर्षांची मुलगी रुशिता हिला घेऊन किराणा सामान घेण्यासाठी गेले होते. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे, ही चार वर्षांची चिमुकली फ्रीज उघडण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिला फ्रिजमध्ये असलेले चॉकलेट घ्यायचे होते. पण तेवढ्यात तिला विजेचा करंट लागतो.


सुरुवातीला मुलीच्या वडिलांच्या काही लक्षात येत नाही. ते फ्रीजमधून काहीतरी काढत असतात आणि मग त्यांचं लक्ष लेकीकडे जातं, मात्र विजेचा करंट इतका जास्त असतो की त्यांची लेक फ्रीजलाच चिकटते आणि तिथेच तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. सुपरमार्केटच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्यं सोमवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.






अनेकांनी वाहिली चिमुकलीला श्रद्धांजली


सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी या चार वर्षांच्या लहान मुलीला श्रद्धांजली वाहिली आहे. हा हृदय पिळवटून टाकणार व्हिडीओ पाहून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.


हेही वाचा:


Earthquake: दिल्लीतील भूकंपानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; लोक म्हणतात- क्या बताऊं यारों, मैं तो हिल गया