Earthquake In Delhi NCR: राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) दुपारी 2 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. त्यानंतर लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले आणि मोकळ्या जागेत येऊन थांबले. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी होती.


नवी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि एनसीआरमध्ये भूकंपामुळे भीती पसरली होती. राजधानी नवी दिल्लीसह या भूकंपाचे धक्के हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये देखील जाणवले. या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.


भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण असतानाच काही लोक या परिस्थितीची मजाही घेत आहेत. सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि व्हिडिओ शेअर करून लोक मजा घेत आहेत. खोडसाळ लोकांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आणि मीम्सवर एक नजर टाकूया.


































भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली असतानाच सोशल मीडियावर मात्र मिम्सचा महापूर आला. काही नेटकऱ्यांनी भूकंपाचे व्हिडिओ पोस्ट केले, तर काहींनी मजेदार मीम्स शेअर केले आहेत. दिल्लीसह उत्तर भारतात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे दिल्ली आणि उत्तर भारतातील लोक मात्र प्रचंड घाबरले होते, प्रत्येकानं आपल्या बचावाचा मार्ग शोधला होता.


हेही वाचा:


VIDEO: वेगात येणाऱ्या ट्रेनसमोर रील बनवणं बेतलं जीवावर; तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद