Viral Video : जगातील प्रत्येकामध्ये काही ना काही खास करण्याची प्रतिभा असते. अशीच काही माणसे जागतिक विक्रम करत नवनवीन उदाहरण मांडताना दिसतात. सामान्य व्यक्तीसाठी रुबिक क्यूब (Rubik Cube) सोडवणे सोपे काम नाही. अनेकजण रुबिक्स क्यूब सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मात्र अनेकदा ते अयशस्वी होताना पाहायला मिळते.


सध्या चेन्नईतील एक मुलगा अविश्वसनीय पद्धतीने रुबिक्स क्यूब सोडवताना दिसत आहे, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. त्याचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मुलाचे नाव जयदर्शन व्यंकटेशन असल्याचे सांगितले जात आहे.







गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, जयदर्शन वेंकटेशन सायकल चालवताना रुबिक्स क्यूब सोडवताना दिसत आहे. जयदर्शनने अवघ्या 14.32 सेकंदात सायकलिंग करत रुबिक्स क्यूब सोडवण्याचा विक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सांगितले आहे की जयदर्शन गेल्या दोन वर्षांपासून क्यूब सोडवण्याचा वेग वाढवण्यासाठी मेहनत घेत होता.


सध्या सायकलवर बसून रुबिक क्यूब सोडवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 3 लाखांहून अधिक व्ह्यूजसह 29 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकरी जयदर्शनचे कौतुक करताना दिसत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha