Mobile Snatching On Moving Train : इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. असाच एक व्हिडिओ नुकताच पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहून तुमचे हसू थांबणार नाही. कारण हा व्हिडिओमध्ये जे काही घडलंय, ते एखाद्या कॉमेडी सीनपेक्षा कमी नाही.


चालत्या ट्रेनमधून अचानक मोबाईल गायब!


हा व्हिडिओ बिहारचा आहे. व्हिडिओमध्ये दोन मुले ट्रेनच्या दारात बसलेली दिसत आहेत. त्यापैकी एक मुलगा इअरफोन घातलेला दिसतो आणि त्याच्या हातात मोबाईल आहे. मग अचानक असे काही घडते की, हातातून मोबाईल गायब होतो. प्रत्यक्षात, व्हिडिओ स्लो मोशनमध्ये परत दाखवला असता, एक तरुण पुलावरून लटकत असल्याचे दिसून येते आणि बघता बघता चालत्या ट्रेनमध्ये मुलाचा मोबाइल हिसकावला. या व्हिडिओचे संगीत देखील विनोदाने परिपूर्ण आहे. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ मजेदार बनला आहे.


 






 


हा व्हिडिओ ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चोरीची ही पद्धत पाहिल्यानंतर सतर्क होण्याची गरज आहे, मात्र हा व्हिडिओ पाहून लोकांचे हसू आवरत नाहीये. हा व्हिडिओ बिहारच्या बेगुसरायचा आहे.


या व्हिडिओला मिळाले लाखो लाईक्स 
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांच्या या क्लिपला सुमारे दोन लाख (1.73 लाईक्स) लोकांनी लाईक केले आहे.


महत्वाच्या बातम्या :