Viral Video : आजवर समुद्राच्या (Sea) खोलवर राहणाऱ्या अनेक प्राण्यांचा शोध लागला आहे, असे म्हणतात की, खोल समुद्रात असे प्राणी असू शकतात, जे मानवाने कधीही पाहिले नाहीत. महासागरांचे जग खूप विचित्र आहे. इथे अशा गोष्टी बघायला मिळतात, ज्याची कोणी अपेक्षाही केली नसेल. समुद्रात असे काही प्राणी राहतात, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. लोकांनी त्यांना पाहिले आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्राण्याचा एक व्हिडीओ व्हायरल (sea angel swimming under white sea) होत आहे, ज्यामध्ये एक अतिशय विचित्र प्राणी पाहायला मिळत आहे. असा प्राणी तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल.


"हे खरोखर आश्चर्यकारक दृश्य"
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पारदर्शक प्राणी खोल समुद्रात पोहत आहे. तो अनेक रंगात दिसत आहे. विशेष म्हणजे तो पारदर्शक आहे, त्याला दोन पंख आहेत आणि त्याच्या डोक्यावर दोन शिंगेही बाहेर येत आहेत. हे खरोखर आश्चर्यकारक दृश्य आहे.  रशियाच्या पांढर्‍या समुद्रात आणि पाण्यात तरंगणारा प्राणी 'सी एंजेल' म्हणून ओळखला जातो. काही लोक याला क्लिओन्स नावाने देखील ओळखतात. त्याचे पंख आणि शिंगे पाहता याला 'समुद्री फुलपाखरू' असेही म्हणता येईल. हा व्हिडीओ आणि त्यात दिसणारा प्राणी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.


 






 


समुद्रात तरंगणाऱ्या विचित्र प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल


या विचित्र प्राण्याचा व्हिडीओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @gunsnrosesgirl3 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, तो एक 'सी एंजेल' आहे, जो रशियाच्या 'व्हाइट सी'च्या खोलवर दिसत आहे. अवघ्या 16 सेकंदांचा हा व्हिडिओ 5 लाख 45 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 18 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.


नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया
हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'हा प्राणी खूपच विचित्र आहे, परंतु तरीही तो आकर्षक आणि सुंदर वाटतो', तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, 'हे काही प्रकारचा समुद्री राक्षस दिसतो.