India's First Real Time Gold ATM : आपण एटीएममधून (ATM) पैसे काढतो त्याप्रमाणेच आता एटीएममधून सोनंही (Gold) काढता येणार आहे. भारतातील एका शहरामध्ये पहिलं गोल्ड एटीएम (Gold ATM) बसवण्यात आलं आहे. देशात पहिल्यांदाच हैदराबादमध्ये (Hyderabad) रिअल टाईम गोल्ड एटीएम (India's First Real Time Gold ATM) बसवण्यात आलं आहे. या एटीएममधून तुम्हाला क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा डेबिट कार्डचा (Debit Card) वापर करुन सोनं (Gold Purchase) खरेदी करता येणार आहे. गोल्डसिक्का (Goldsikka Limited) कंपनीने हैदराबादमध्ये जगातील पहिलं सोन्याचं एटीएम बसवलं आहे. यामधून एटीएम सोन्याची नाणी काढता येतात. 


First Real Time Gold ATM : जगातील पहिलं रिअल-टाइम गोल्ड एटीएम


या गोल्ड एटीएममधून 0.5 ग्रॅम पासून 100 ग्रॅमपर्यंत सोन्याची नाणी खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला आठ पर्याय देण्यात आले आहेत. या गोल्ड एटीएममधून 0.5 ग्रॅम पासून 100 ग्रॅमपर्यंत सोन्याची नाणी खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला आठ पर्याय देण्यात आले आहेत. या एटीएममधून तुम्ही 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशाप्रकारे सोन्याची नाणी काढू शकता. गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड (Goldsikka Pvt Ltd) कंपनीने हैदराबाद स्थित स्टार्टअप कंपनी ओपनक्यूब टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या (OpenCube Technologies Pvt Ltd) साहाय्याने 3 डिसेंबर रोजी पहिलं गोल्ड ATM लाँच केलं आहे. हे भारतातीलच नाही तर जगातील पहिलं रिअल-टाइम गोल्ड एटीएम आहे.






Gold ATM : गोल्ड एटीएम मशीनमध्ये पाच किलो सोनं ठेवण्याची क्षमता


गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते. गोल्डसिक्का गोल्ड एटीएम मशीनमध्ये पाच किलो सोनं ठेवण्याची क्षमता आहे. गोल्डसिक्का कंपनीचे उपाध्यक्ष प्रताप यांनी सांगितलं की, 'गोल्डसिक्का (Goldsikka Limited) ही कंपनी 4 वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे. आम्ही सराफा व्यापारी आहोत. आमच्या सीईओंना एटीएम मशीनद्वारे सोन्याची नाणी काढण्याची नवीन संकल्पना सुचली. संशोधन केल्यावर आम्हाला ही संकल्पना सत्यात उतरवता आली आहे.'


Goldsikka Gold ATM : हैदराबाद येथे गोल्ड एटीएम


त्यांनी सांगितलं की, गोल्डसिक्का कंपनीने ओपनक्यूब टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत (OpenCube Technologies) या स्टार्ट-अप कंपनीशी करार केला आहे. त्यांनी आणि आमच्या इन-हाउस डिपार्टमेंटने तंत्रज्ञानाच्या आधारे एटीएम मशीनची संकल्पना खरी करत गोल्ड एटीएम बनवलं. पहिलं रिएल टाईम गोल्ड एटीएम मशीन एटीएम अशोक रघुपती चेंबर्स, प्रकाश नगर मेट्रो स्टेशन बेगमपेठच्या गोल्डसिक्का कंपनीच्या मुख्य कार्यालयात बसवण्यात आलं आहे. गोल्ड एटीएममध्ये पाच किलो सोनं साठवून ठेवण्याची क्षमता आहे.