Accident Viral Video: सोशल मीडियावर दरदिवशी विविध व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित होतात तर काहींना हसू आवरत नाही. यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात रस्त्यावर अपघात होताना दिसत आहेत. अपघाताचे व्हिडीओ पाहून अनेकवेळा चिंता व्यक्त केली जाते. मात्र सोशल मीडियावर अपघाताचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून नेटकरी चिंता व्यक्त करत नसून तयाची खिल्ली उडवत आहेत. 


अनेकदा अशा व्हिडीओंमध्ये महिला विचित्र पद्धतीने वाहने चालवताना दिसल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांना पापा की परी (Papa Ki Pari Funny Video) म्हणतात. यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओंमध्ये (Viral Video) एक मुलगी तिची स्कूटी सुरू करताच मंदिरात घुसल्याचं दिसलं आहे. तर आणखी एका व्हिडीओमध्ये (Viral Video) रस्त्यावर स्कूटी चालवणारी एक मुलगी तिला पायाने स्कूटर थांबवताना अपघात झाल्याचं ही पाहायला मिळालेलं आहे. 






अशातच सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ (Viral Video) समोर आला. या व्हिडीओमध्ये एक मुलगी पार्किंगमध्ये तिची स्कूटी पार्क करताना दिसत आहे. स्कूटर पार्क करत असताना तिला काही अडचणींचा सामना करावाला लागत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. याचदरम्यान, मुलीची स्कूटी पडते. ही मुलगी पुन्हा स्कूटर उचलताना तिच्याकडून एक्सलेटर दाबला जातो आणि स्कूटी पुढे धावू लागते आणि समोर उभ्या असलेल्या दुचाकीला धडकताना या व्हिडीओत (Viral Video) दिसत आहे.


Viral Video : नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली 


हा व्हिडिओ 'जिंदगी गुलजार है' नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ (Viral Video) शेअर करताना कॅप्शनमध्ये 'पापा की परी' असे लिहिले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी मजेशीर कमेंट करताना दिसतात. एक यूजर म्हणतो, 'यात दीदींचा काय दोष? तुम्ही पार्किंगमध्ये गाडी पार्क केली तर दीदी गाडी कुठे चालवणार?'


इतर महत्वाच्या बातम्या: 


Flex Fuel Bike: टीव्हीएस घेऊन येत आहे पहिली फ्लेक्स फ्यूल बाईक, हिरो आणि बजाजही आहेत शर्यतीत