Flex Fuel Bike: देशात फ्लेक्स फ्यूल कार लॉन्च झाल्यानंतर आता लवकरच फ्लेक्स फ्यूल बाईक देखील लॉन्च होणार आहे. आघाडीही दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर लवकरच भारतात फ्लेक्स फ्यूलव धावणारी बाईक लॉन्च करू शकते. कंपनीने सांगितले आहे की, पुढील वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान ती आपली पहिली फ्लेक्स फ्यूल बाईक सादर करेल. याआधीही कंपनीने फ्लेक्स फ्यूल बाईक सादर केली आहे, परंतु यावेळी कंपनीचे हे मॉडेल उत्पादनासाठी सज्ज असेल.
आपल्या अधिकृत निवेदनात टीव्हीएसने सांगितले आहे की, या बाईकचे उत्पादन सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 दरम्यान सुरू केले जाईल. कंपनीने सोमवारी (12 डिसेंबर) दिल्लीत आयोजित इथेनॉल तंत्रज्ञान प्रदर्शनात ही माहिती दिली.
Flex Fuel Bike: बजाज, हिरो मोटोकॉर्प, होंडा आणि सुझुकीही शर्यतीत
या शर्यतीत फक्त टीव्हीएस नाही तर बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp), होंडा टू-व्हीलर आणि सुझुकी मोटरसायकल यांसारख्या दुचाकी कंपन्याही इथेनॉल वाहने बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. या प्रदर्शनात रॉयल एनफिल्ड आणि यामाहा मोटर इंडियाचाही सहभाग होता. या प्रदर्शनात देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी देखील आपल्या फ्लेक्स फ्यूल कारसह सहभागी झाली होती. कार निर्मात्याने वॅगनआरचे फ्लेक्स इंधन मॉडेल प्रदर्शित करण्यात आले.
What are flex fuel vehicles? फ्लेक्स फ्यूल वाहने काय आहेत?
फ्लेक्स इंजिन वाहने फ्लेक्स फ्यूल वर चालण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. अशी वाहने पूर्णपणे इथेनॉल, फ्लेक्स-फ्यूल (पेट्रोल आणि इथेनॉलचे मिश्रण) किंवा पेट्रोल-डिझेलवर चालतात. इथेनॉलवर चालत असल्यामुळे अशी वाहने हानिकारक वायूंचे उत्सर्जन कमी करतात आणि पर्यावरणाचेही कमी नुकसान करतात.
केंद्र सरकार भारतात फ्लेक्स इंजिन वाहनांचे उत्पादन सुरू करण्यासाठी धोरण तयार करत आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर देशातील वाहन कंपन्यांना फ्लेक्स इंजिन असलेली वाहने तयार करणे बंधनकारक होणार आहे. एका रिपोर्टनुसार, फ्लेक्स फ्यूलपासून भारतात दरवर्षी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इथेनॉलचा व्यापार होऊ शकतो. इथेनॉलच्या वापरामुळे भारताचे पेट्रोलच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कोट्यवधी रुपयांच्या महसुलातही बचत होईल. याशिवाय इथेनॉल मिश्रित फ्लेक्स-फ्यूल वापरल्याने वाहनांमुळे होणारे प्रदूषणही कमी होईल.
इतर ऑटो संबंधित बातम्या:
महिंद्राची कमाल! लॉन्च केली फक्त 60 किलो वजन असलेली इलेक्ट्रिक बाईक, मिळणार जबरदस्त रेंज आणि फीचर्स
Car loan Information:
Calculate Car Loan EMI