Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका गोरिलाचाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या व्हिडीओमधील हा गोरिला त्याचा 65 वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. व्हिडीओला कमेंट आणि लाइक करून अनेक नेटकऱ्यांनी या गोरिलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, या गोरिलासाठी 65 असं लिहिलेला केक ठेवण्यात आलेला आहे. हा केक पाहिल्यानंतर गोरिला त्या केक जवळ येतो आणि केक खायला सुरूवात करतो. गोरिला हे सरासरी 35 ते 40 वर्षे जगतात. त्यामुळे  65 वर्षाच्या गोरिलाचा व्हिडीओ पाहून काही नेटकरी थक्क झाले आहेत. या गोरिलाचं नाव फतोउ असं आहे. तो बर्लिन प्राणीसंग्रहालयात राहतो. त्याच्या 65 व्या बर्थ-डेसाठी त्याला केक देऊन खास बर्थ-डे सेलिब्रेशन करण्यात आलं. 


पाहा हा व्हिडीओ : 






गोरिलाचा हा व्हिडीओ पाच हजार पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. झू बर्लिन या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या :