Viral Video : भारतामधील अनेक राज्यांमध्ये सध्या  उन्हाचा तडाखा वाढला आहे. काही राज्यांमध्ये 40 अंशापेक्षा जास्त तापमान झालं आहे. उन्हामुळे अनेक लोक घराच्या बाहेर देखील जात नाहित. पण एक महिला मात्र घराबाहेर जाऊन चक्क गाडीच्या बोनेटवर चपात्या भाजत आहे. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. 


ओडिशामधील सोनपूर येथील हा व्हायरल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ नीलामाढाब पांडा या नेटकऱ्यानं शेअर केला आहे. ओडिशामध्ये सध्या 40 अंशापेक्षा जास्त तापमान आहे. नीलामाढाब पांडानं शेअर केलेल्या या व्हिडीओला कॅप्शन दिले, 'माझ्या सोनपूर या शहरातील हे दृष्य आहे. इथे एवढे गरम तापमान आहे की, तुम्ही गाडीच्या बोनटवरच चपात्या भाजू शकता.'   या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइक केलं आहे. 






हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांमध्ये दिल्लीमधील कमाल तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.दिल्लीत 28 एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायव्य आणि मध्य भारताच्या लगतच्या भागांमध्ये एप्रिलमध्ये सतत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने यापूर्वी सांगितले होते. यावर्षीचा मार्च हा भारतातील गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :