Viral Video : तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, भारतात एक अशी शाळा (School) आहे जिथे मुलांना फी म्हणून पैसे जमा करावे लागत नाहीत, तर विद्यार्थ्यांना असे काही करावे लागते, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. शाळेची फी भरण्याऐवजी या शाळेतील विद्यार्थ्यांना काय करावे लागते? जाणून घ्या
शाळेची फी भरण्याऐवजी या शाळेतील विद्यार्थ्यांना 'असे' करावे लागते
प्रत्येक मुलासाठी शिक्षण महत्वाचे आहे, शिक्षणामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतो, भविष्यात तो स्वतःसाठी काहीतरी करू शकतो. आजच्या काळात लोकांना शिक्षणाची किंमत कळायला लागली असली तरी, काळाबरोबर शिक्षणही महाग झाले आहे. यामुळेच प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या चांगल्या शिक्षणासाठी पै-पै वाचवू लागतो, पण काही शाळा अशा आहेत ज्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करतात. जेणेकरुन भारतातील प्रत्येक मूल चांगले शिक्षण घेऊन त्याचे भविष्य घडवू शकेल. अलीकडे, अशीच एक शाळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे, जी भारतातील आसाममध्ये आहे.
या शाळेत फी म्हणून पैसे जमा करावे लागत नाहीत
आसाममधील गुवाहाटीतील या शाळेने विविध प्रोजेक्ट राबवले जात आहेत, जे आता इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शाळेत मुलांना फी म्हणून पैसे जमा करावे लागत नाहीत, तर रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा कराव्या लागतात. आश्चर्यकारक बाब म्हणजे येथे शिकणारी मुले अभ्यासासोबतच पैसेही कमावतात. ग्रामीण भागातील शंभरहून अधिक मुले येथे शिक्षण घेतात, असे सांगितले जात आहे.
विद्यार्थी अभ्यासासोबतच पैसेही कमावतात
फीबद्दल बोलायचे झाले तर, दर आठवड्याला मुले येथे 25 रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करतात. अशा प्रकारची शाळा सुरू करण्याची कल्पना एका दाम्पत्याला सुचली, ज्यांनी या शाळेच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य तसेच शिक्षणाचा अभाव पाहिला होता, त्यामुळेच मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि समाजासाठी काहीतरी चांगले शिकावे यासाठी त्यांची धडपड सुरू होती, त्यासाठी त्यांनी अशाप्रकारच्या शाळेची सुरुवात केली. इथे अभ्यासासोबतच मुलांना सुतारकाम, बागकाम आणि इतर कला शिकवल्या जात होत्या तसेच प्लास्टिकच्या बाटल्यांपासून अनेक प्रकारच्या वस्तू कशा बनवायच्या हे शिकवले जाते.
इतर संबंधित बातम्या