Viral Video : 'फुकट तिथे चिकट' ही म्हण आपल्या देशात खूप प्रचलित आहे. जिथे मोफत गोष्टी मिळाल्या, तिथे लोकांची पाऊले वळतात, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ज्यावर कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नाही. त्याला फुकट असे म्हणतात. ही म्हण अलीकडेच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Viral Video) जबलपूर (Jabalpur) येथे एका जनजागृती मोहिमेदरम्यान खरी असल्याचं दिसून आलं.
हेल्मेट न घातल्याने रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू
माहितीनुसार देशभरात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे हेल्मेट न घातल्याने होतात. तर, दुसरीकडे राज्यांचे पोलिसही हेल्मेट न घालणाऱ्या लोकांचे चलन कापताना दिसत आहेत. एवढे सगळे होऊनही अनेक लोकं हेल्मेटशिवाय दुचाकीवर जाताना दिसतात. अशा परिस्थितीत जबलपूर येथील वाहतूक पोलिसांनी जनजागृती अभियानांतर्गत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी चक्क हंगामा पाहायला मिळाला.
लोकांना शांत करण्याऐवजी पोलिसांचे हेल्मेट वाटप सुरूच
यावेळी वाहतूक पोलिसांसमोर जनतेकडून हेल्मेटची लूट होताना दिसली. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा शेअर केला जात आहे. यामध्ये मोफत हेल्मेट घेण्यासाठी लोकांची झुंबड उडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी जनजागृती अभियानांतर्गत 200 हेल्मेट वाटपाचे नियोजन केले होते. यावेळी लोकांची एवढी गर्दी झाली की, पोलिसांनी ती शांत करण्याऐवजी हेल्मेट वाटप करत सुटले. अशा या वेळचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर, युजर्स सतत पोलिसांच्या जनजागृती मोहिमेचे आणि हेल्मेट वाटपाच्या योजनेचे कौतुक करताना दिसतात. मात्र अशा वेळी फुकट हेल्मेट घेण्यासाठी लोकांची आटोक्यात न येणारी गर्दी पोलीसही नियंत्रित करू शकले नाही, अशी माहिती आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणेचे चक्क तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Viral Video : पूलाखाली गरीब मुलांना शिकवताना दिसली मुलगी, नेटकरी म्हणाले- 'ही साक्षात सरस्वती!' मन जिंकतोय व्हिडीओ