Viral Video : प्रत्येक मुलाने शिक्षण घ्यावे, प्रत्येक मुलाने पुढे जावे (Education) हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते, पण ते पूर्ण करणे प्रत्येकाच्या हातात नसते. गरिबीमुळे तसेच उदरनिर्वाहामुळे काही मुलांचे बालपण निघून जाते, ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, काहींना इच्छा असूनही अनेक मुलांना शाळेचा चेहराही पाहता येत नाही. अशा परिस्थितीत एक मुलगी अशा गरीब मुलांसाठी (Viral Video) वरदान ठरत आहे, जी आपल्या व्यस्त दिनचर्येतून महत्त्वाचा वेळ काढून केवळ शिक्षणापासून कोणतेही मूल वंचित राहू नये यासाठी महत्वाचं योगदान देत आहे.
केवळ शिक्षणासाठी तिची तळमळ..
साक्षरता अभियानांतर्गत सरकार देशभरात सर्वांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत असले, तरी या देशात असे काही लोक आहेत, जे गरिबीमुळे मुलांना शाळेत नेऊ शकत नाहीत. अशातच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी फ्लायओव्हरखाली काही गरीब मुलांना शिकवताना दिसत आहे. ट्विटरवर 'जिंदगी गुलजार है!' पेजवर एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फ्लायओव्हरखाली बोर्ड लावून रस्त्यावर जीवन जगणाऱ्या मुलांना ती शिकवताना दिसली.
व्हिडीओला 78 हजारांहून अधिक व्ह्यूज
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी फ्लायओव्हरच्या खाली रस्त्यावरील मुलांना शिकवताना दिसत आहे. मुलीने एक पांढरा फलक लावला होता जेणेकरून ती सर्व मुलांना गोष्टी समजावून सांगू शकेल. त्या मुलांनाही लिहिण्याची आवड होती, म्हणूनच ते सर्व काही सोडून शिक्षिका दीदीसमोर बसून ज्ञानाचे धडे वाचताना दिसत होते. रस्त्याच्या कडेला वाहनांच्या गजबजाटात शिक्षणाचा प्रकाश पसरवणाऱ्या मुलीच्या व्हिडीओला 78 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
गरीब मुलांना शिक्षणाचा प्रकाश दाखवणारी मुलगी
ज्या मुलांसाठी सरकार किंवा प्रशासनाला काळजी घेण्यास वेळ नाही, त्या निराधार आणि निरागस मुलांसाठी, एक मुलगी आपला अमूल्य वेळ काढून त्यांना शिक्षण देण्यात गुंतलेली दिसली, हा व्हिडीओ खूप प्रेरणादायी आहे. मुलीचा हा प्रयत्न अनेक यूजर्सना खूप आवडला आहे. एका यूजरने लिहिले - तरुणांनी अशा गरीब असहाय मुलांना शिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे, खूप आनंद झाला. हे सर्व पाहून आपल्या शिक्षण संस्कृतीचा योग्य वापर करायला शिका. आणखी एका युजरने या मुलीला सरस्वतीचे रूप म्हटले आहे. हा व्हिडीओ सर्वांना खूप आवडला आहे, आशा आहे की, मुलीच्या या प्रयत्नांना नक्कीच फळ मिळेल आणि या निराधार मुलांनाही शिक्षण घेऊन पुढे जाण्याची संधी मिळेल.
महत्वाच्या बातम्या :
Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही