मुंबई : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप स्पेशल दिवस असतो.  साधारणपणे लग्न म्हणलं की त्यावेळी नवरदेवाचे  मित्र- मैत्रीण लग्न  स्पेशल करण्यासाठी भन्नाट प्लान करत असतात. असाच शिकागोमधील मित्रांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर झाले तर काहींनी मित्राच्या या कृतीचे कौतुक केले.  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ शिकागो येथे भारतीय पद्धतीने झालेल्या लग्नातील आहे. परदेशात वास्तव्यास असणारे दोन तरूण आपल्या मित्राच्या लग्नासाठी तयार होत आहे. त्या मित्रांना एक महिला तयार होण्यासाठी मदत करत आहे. या भारतीय वरासाठी त्याच्या दोन मित्रांनी लग्नात  मित्रांनी चक्क साडी नेसून या लग्नाला हजेरी लावली. फक्त साडी नाही तर त्यांनी टिकली देखील लावली आहे. जेव्हा मित्रांने या दोघांना साडीमध्ये पाहिले तेव्हा त्यांना हसू अनावर झाले. त्यानंतर मित्राने त्यांना जाऊन मिठी मारली. 






 


 


 शिकागोमधील लग्नात या पुरुषांनी साडी नेसून येण्याचा हा निर्णय जेंडर स्टीरीओटाईप नष्ट होत असल्याचे दाखवणारा आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हीडिओवर केल्या आहेत. हा व्हिडीओ ‘पॅरागॉन फिल्म्स’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे