Iran Hijab Protest Viral Video : इराणमध्ये (Iran) हिजाबविरोधी (Hijab) निदर्शने दिवसेंदिवस उग्र होत आहेत. याच्याशी संबंधित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये लोकं रस्त्यावर उतरत सरकार आणि मौलवींच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आता हे लोक मौलवींवर निशाणा साधत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण मौलवीची पगडी काढताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
17 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने उफाळून आली, अमिनीच्या मृत्यूनंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले, अनेक मुलींनी निषेधाचे नेतृत्व केले. सरकार आणि मौलवींच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. तर, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला एका मौलवीकडे रस्त्याने चालत जाते आणि त्यांची पगडी उतरवते. दुसर्या व्हिडीओमध्ये इराणमधील एका बस स्टॉपवर तरुणाने एका मौलवीची पगडी काढून फेकली.
सरकार आणि मौलवींच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष
इराणमध्ये गेल्या एक महिन्यापासून हिजाबच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन 30 हून अधिक शहरांमध्ये पसरले आहे, सरकार त्यांच्यावर दबाव टाकण्याचे धोरण आखत आहे. तर यापूर्वी इराणचे शिक्षण मंत्री युसूफ नूरी यांनीही हिजाबला विरोध करणारे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मानसिक आजारी असल्याचे म्हटले होते. तर या आंदोलनांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 20 वर्षांखालील अनेक मुलींचाही समावेश आहे.
या आंदोलनामागे महसा अमिनीची कहाणी
इराणमध्ये हिजाबच्या विरोधात उभ्या राहिलेल्या या आंदोलनामागे महसा अमिनीची कहाणी आहे. 22 वर्षीय महसा अमिनी 13 सप्टेंबर रोजी कुर्दिस्तानहून इराणची राजधानी तेहरानला तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पोहोचली होती. महसा अमिनीच्या डोक्यावर हिजाब होता, पण इराणच्या कायद्यानुसार तो योग्य नव्हता, कारण त्यातून महसा अमिनीचे केस दिसत होते. यानंतर इराणच्या मॉरल पोलिसांनी महसाला सोबत घेतले. इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महसा ज्या डिटेन्शन सेंटरच्या बाहेर गेली होती, त्या ठिकाणी तिचा भाऊ उपस्थित होता. त्यावेळी भावाने महसाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला. महसाला अटक होण्यात आणि रुग्णालयात जाण्यासाठी फक्त दोन तास लागले. इराण सरकारने सांगितले की, महसाला हृदयविकाराचा झटका आला होता. महसा कोमात गेली आणि 16 सप्टेंबर रोजी तिच्या मृत्यूची बातमी आली. महसाच्या मृत्यूची बातमी इराणमध्ये आगीसारखी पसरली आणि वर्षानुवर्षे दडपलेला क्रोधाचा ज्वालामुखी फुटला. एका घटनेने इराण हादरला. महिलांनी त्यांचे हिजाब काढून रस्त्याच्या मधोमध जाळपोळ सुरू केली