Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan Birthday) आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यासोबतच देश-विदेशातील त्याचे चाहतेही त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन द्विगुणित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र शाहरुख खानच्या वाढदिवसापूर्वी काल रात्री असे काही घडले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे.


'या' व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले


शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या तयारीदरम्यान काल रात्री सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडीओ शाहरुख खानशी संबंधित असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, शाहरुखची आलिशान मर्सिडीज बेंझ कार टोइंग व्हॅनद्वारे टोईंग केली जात आहे. विशेष म्हणजे या एस-क्लास कारची किंमत जवळपास 1.59 कोटी रुपये आहे.बादशाहची मर्सिडीज बेंझ वाहतूक पोलिसांनी उचलली आहे. अशा स्थितीत त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.






व्हिडीओ काही वेळातच व्हायरल


कारचा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला, ज्याला पाहून चाहते व्हिडीओवर सतत कमेंट करत आहेत. चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'सर्व्हिसिंगसाठी घेतली असेल.' दुसर्‍याने कमेंट केली की, मुंबई वाहतूक पोलिसांनी गाडी उचलली असून नियम सर्वांसाठी समान आहेत' 



मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी


काल हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आज शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मन्नतच्या बाहेर गर्दी केली होती. शाहरुख त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी त्याच्या घराबाहेर पोहोचला, जे पाहून चाहते खूप खुश झाले. यावेळी शाहरुख खानने ब्लॅक टी-शर्ट आणि लोअर घातला होता. यावेळी त्याच्यासोबत बाहेर आलेला त्याचा धाकटा मुलगा अबरामही उपस्थित होता, जो खूपच क्यूट दिसत होता.



शाहरुखचा आगामी चित्रपट
किंग खान 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर तो 'डंकी' आणि 'अटले के जवान'मध्ये दिसणार आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी