China Covid Lockdown : चीनमधील (China) कोरोना महामारी (Corona) संपण्याचे नाव घेत नाही आहे. चीनमधील अनेक राज्ये कोरोनाच्या विळख्यात आहेत. अनेक प्रांतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊन लागू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, चिनी कामगार देशातील सर्वात मोठ्या आयफोन (iPhone) प्लांटमधून पळून जात आहेत. कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये कडक निर्बंध जाहीर केले आहेत. अॅपल आयफोन बनवणाऱ्या फॉक्सकॉनच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून पळून जाताना कामगारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



कर्मचारी कडक विलगीकरणात
फॉक्सकॉनचे कर्मचारी चक्क पळ काढताना दिसत आहेत. चिनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लोक फॉक्सकॉनच्या मालकीच्या प्लांटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Zhengzhou Foxconn मध्ये सुमारे 3,00,000 कर्मचारी काम करतात आणि जगातील अधिक iPhones या कारखान्यात बनतात.


 






चीनमध्ये सार्वजनिक वाहतूक ठप्प
कोविड लॉकडाऊन आणि अन्नाच्या कमतरतेमुळे हेनान प्रांतातील अनेक स्थलांतरित मजूर घरी धावत आहेत. लॉकडाऊनमुळे चीनमध्ये सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. यासंदर्भात चिनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यात फॉक्सकॉनचे कामगार त्यांच्या घरी परतताना दिसत आहेत. फॉक्सकॉनच्या कामगारांसाठी रस्त्यावर खाण्याचीही व्यवस्था केली जात आहे. हेनान प्रांताची राजधानी झेंगझोऊमध्ये गेल्या सात दिवसांत कोरोनाचे 97 रुग्ण आढळले आहेत. सुमारे 10 दशलक्ष लोकसंख्येचे शहर अंशतः लॉक डाऊन करण्यात आले आहे. चीन शून्य कोविड धोरणांतर्गत कडक लॉकडाऊन सुरू ठेवणार आहे.


चीनचे शून्य कोविड धोरण
फॉक्सकॉन, यूएस-आधारित ॲपल कंपनीला पुरवठादार म्हणून काम करते, त्याच्याच झेंग्झू कॅम्पसमध्ये हजारो कर्मचारी आहेत. चीनच्या कठोर शून्य-कोविड धोरणांतर्गत शहरे कोरोनामुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये लॉकडाऊनसोबतच लोकांच्या बाहेर जाण्यावर आणि प्रवासावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


टाटा ग्रुपमध्ये बंपर भरती,  iPhone च्या प्लॅन्टमध्ये 45,000 महिला कर्मचाऱ्यांची होणार भरती