Wedding Viral Video : लग्नसराईचा (Wedding Season) महिना सुरू झाला असून या दरम्यान तुम्हाला विवाहाशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतात. वधूच्या मेक-अपपासून ते लग्नाचा मंडप आणि वधूच्या निरोपापर्यंतचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. काही व्हिडीओ खूप मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ लोकांना भावूकही करतात. तर कधीकधी काही व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही वधू-वरांना जयमाला घालून किंवा स्टेजवर नाचताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी वधू-वरांना स्टेजवर हुक्का ओढताना पाहिलं आहे का? होय, असेच काहीसे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ज्यामुळे नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
नवी फॅशन म्हणून वधू-वराने केला पराक्रम
परदेशात लग्नसमारंभात वधू-वर एकमेकांचे चुंबन घेणे आता सामान्य गोष्ट आहे, परंतु भारतात ही परंपरा नाही, परंतु आता नवी फॅशन म्हणून व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामुळे केवळ लग्नाला आलेले पाहुणेच नव्हे, नेटकरीही हैराण झाले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत आणि त्यांच्यासमोर एक हुक्का देखील आहे, ज्याचा पाईप वधूच्या हातात आहे. वधू आणि वर हुक्का पीत असून दोघेही तोंडातून धूर तोंडातून सोडत आहे. हे दृश्य असे होते की साहजिकच लग्नाला आलेल्या पाहुण्यांना हे पाहून धक्का बसला असेल. कोण लग्नाच्या दिवशी हुक्का पितो? आणि तेही वधू आणि वर? ही अगदीच अनपेक्षित घटना आहे.
अनेक लोकांकडून व्हिडीओला लाईक
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर laiba._waseem नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 64 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे.
इतर बातम्या
Lesbian Couple Photoshoot: लेस्बियन कपलचे अनोखे फोटोशूट व्हायरल, 'अशी' आहे अदिला-फातिमाची प्रेमकहाणी