Viral Video : माणूस (Viral Video) कोणतीही कला जेव्हा मनापासून शिकतो, तेव्हा त्याला जीवन जगण्यात कोणतीही अडचण येत नाही. हे कलाकार जेव्हा आपली कला सादर करतात, तेव्हा ते एक वेगळी छाप सोडतात. जे पाहिल्यानंतर अनेक जण आश्चर्यचकित होतात. असाच काहीसा प्रकार गोव्यात (Goa) पाहायला मिळत आहे, जिथे काही कलाकारांनी आपली कला अशा प्रकारे सादर केली आहे की, युजर्स (Social Media) त्यांचे जोरदार कौतुक करत आहेत.
कलाकारांच्या कलेचं नेटकऱ्यांकडून कौतुक
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शहरी लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. हे आपणा सर्वांना माहीत असल्याने देशातील अनेक राज्यांची सरकारे उद्यानांमध्ये ओपन जिमची सेवा देत आहेत. मात्र लोक उद्यानात येण्याचे नाव घेत नाहीत. अशातच गोव्यातील एका कलाकाराने मैदानी व्यायामशाळेचे उद्यानात रूपांतर केले आहे, जिथे व्यायामासाठी येणारे लोक अनोख्या पद्धतीने व्यायाम करू शकतात.
जिमकडे आकर्षित करणारी पौराणिक पात्र
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पार्कमध्ये लोक पौराणिक पात्रांसोबत कसरत करताना दिसत आहेत. जी खूपच आकर्षक दिसते आणि लोकांना जिमकडे आकर्षित करत आहे. ही कला निर्माण करणाऱ्या कलाकाराचे नाव दिप्तेज वेर्णेकर असे आहे. त्यांच्या कलेमध्ये तंत्रज्ञानालाही तितकेच महत्त्व आहे. रावणासारख्या पौराणिक पात्रांसह लोक मैदानी जिममध्ये कसरत करू शकतात. वेर्णेकर यांनीही हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
कलेसोबत तंत्रज्ञानालाही तितकेच महत्त्व
शहरी यंत्रणा आणि स्थानिक तंत्रज्ञान यांची सांगड घालता यावी. यासाठी अशाप्रकारे ओपन जीम क्रिएटिव्ह बनवल्याचे वेर्णेकर सांगतात. आतापर्यंत या व्हिडीओला शेकडो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असून लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. "ही एक जबरदस्त ट्रिक आहे, तसेच ही पद्धत लोकांना फिटनेसकडे खेचते." असे अनेक यूजर्स म्हणाले. दरम्यान, गोव्यात 15 ते 23 डिसेंबर दरम्यान सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सण दक्षिण आशियाई प्रदेशातील एक मोठा कार्यक्रम आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: