Viral News : महाराष्ट्रातील (Maharashtra) चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक घर आहे, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. घराचा एक भाग महाराष्ट्रात आणि दुसरा तेलंगणात (Telangana) येतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. यामुळे घरमालकाला दोन्ही राज्यांचा कर भरावा (Viral News) लागतो. दोन राज्यांत पसरलेल्या या अनोख्या घराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले हे अनोखे घर!
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजगुडा गावात असलेले हे घर दोन राज्यांच्या म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर आहे. त्यात महाराष्ट्रात 4 आणि तेलंगणात 4 खोल्या आहेत. मात्र, यामुळे दोन्ही राज्यांचा कर भरणारे मालक उत्तम पवार यांनी आपल्याला याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. उलट त्यांना दोन्ही राज्यांचा पुरेपूर लाभ मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर चर्चा
उत्तम पवार सांगतात की त्यांच्या घरात 13 सदस्य राहतात. त्यांच्याकडे तेलंगणात स्वयंपाकघर आणि महाराष्ट्रात बैठकीची खोली आहे. तर भावाची खोली तेलंगणात आहे. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, 1969 मध्ये जेव्हा सीमा सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की त्यांचे अर्धे घर महाराष्ट्रात आहे, तर अर्धे घर तेलंगणात आहे.
4 खोल्या तेलंगणात आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात
घरमालकाने सांगितले की, घरात 8 खोल्या आहेत. यातील 4 खोल्या तेलंगणात आणि उर्वरित महाराष्ट्रात आहेत. आमच्या घरात 12 ते 13 लोक राहतात आणि आमचे स्वयंपाकघर तेलंगणात आहे. 1969 मध्ये सीमा सर्वेक्षण झाले, तेव्हा आम्ही सांगितले की आमचे अर्धे घर महाराष्ट्रात आणि अर्धे तेलंगणात आहे. त्याचा आम्हाला त्रास होत नाही. दोन्ही राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आम्ही कर भरतो आणि तेलंगणा सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेतो, असेही जमीनदार पवार म्हणाले.
दोन देश एक घर
नागालँडमधील मोन जिल्ह्यातील लोंगवा गावातील अर्धे घर भारतात आहे, तर अर्धे घर म्यानमारमध्ये आहे. घराच्या मधोमध आंतरराष्ट्रीय सीमा जाते. येथील ग्रामस्थांना दुहेरी नागरिकत्व मिळाले आहे आणि ते दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे फिरू शकतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: