Viral Video : असे म्हणतात की, ब्रम्हदेव स्वर्गातच दोघांच्या रेशीमगाठी (Wedding Viral Video)  बांधतात. प्रत्येकाच्या नशिबात काहीतरी चांगले लिहिलेले असते. जे त्याला भेटतं, तसेच ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं असतं, तो व्यक्तीही अखेर मिळतो. मात्र यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो, मार्गात विविध अडथळे येऊ शकतात, परंतु जे नशिबात लिहिले असेल ते निश्चितपणे मिळतेच. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याच्याशी संबंधित एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तीन फुटाच्या नवरदेवाचा विवाह थाटामाटात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या अनोख्या लग्नात वधू-वरांच्या कुटुंबीयांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.


तीन फुटाच्या नवरदेवाचा विवाह थाटामाटात..!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अनोख्या लग्नाची चर्चा अशी होती की, न बोलावलेले लोकही या जोडप्याला भेटायला आले होते. सीतामढीच्या पुनौरा धाम या ठिकाणी या जोडप्याने थाटामाटात लग्न केले. तसे, साधारणपणे तीन फूट उंचीची माणसे कमी असतात आणि असली तरी मोठ्या कष्टाने लग्न करतात. या जोडप्याबाबतही असेच घडले, पण अखेरीस त्यांना एकमेकांचा आधार मिळाला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू लग्नाचा पोशाख परिधान करून उभी आहे. तिच्या आजूबाजूला तिच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसह बरेच लोक उभे आहेत. तेव्हा, काही वेळात वरही तेथे येतो आणि वधूचा हात धरून फोटो काढतो.


पाहा या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ


 


 






 


या अनोख्या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.माहितीनुसार, तीन फुटी वधूचे नाव पूजा असून तिचे वय 21 वर्षे आहे. पूजा ही सीतामढीच्या लोहिया नगरची रहिवासी आहे. तर, योगेंद्र असे वराचे नाव असून तो सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकचा रहिवासी आहे. योगेंद्र यांचे वय 32 वर्षे आहे.



योगेंद्र बऱ्याच दिवसांपासून जोडीदाराच्या शोधात होता


मिळालेल्या माहितीनुसार, योगेंद्र बऱ्याच दिवसांपासून आपल्या आयुष्याचा जोडीदाराच्या शोधात होता, तर पूजालाही स्वत:साठी वर शोधण्यात अडचण येत होती, पण त्यांचे म्हणणे आहे की, कोणाच्या नशिबात जे लिहिले आहे, ते मिळतेच. अशातच पूजा आणि योगेंद्र यांची भेट झाली आणि त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bride Groom Video : नवरदेवाने भरमंडपात केली नवरीची मस्करी, पुढे काय झालं तुम्हीच पाहा; व्हिडीओ होतोय व्हायरल