Satyendra Jain Video Leak : तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेल्या सत्येंद्र जैन व्हिडिओ लीक प्रकरणी (Satyendra Jain Video Leak) नवा खुलासा झाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेले आपचे (AAP) मंत्री सत्येंद्र जैन(Satyendra Jain) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. भाजपचे (BJP) प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) सत्येंद्र जैन तुरुंगात मसाज करताना दिसले. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली.


 


 






तो व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नव्हताच...
अलीकडेच तिहार जेलमधून एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांचा मसाज करताना दिसत आहे. आता तिहार तुरुंगातील सूत्रांकडून समजले आहे की, तो व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून ती बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी आहे. त्याचे नाव रिंकू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रिंकूवर POCSO च्या कलम 6 आणि IPC च्या कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 






 


'अशा प्रकारे खिल्ली उडवणे लाजिरवाणे' - मनीष सिसोदिया
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तत्काळ सत्येंद्र जैन यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. तिहारचे व्हिडिओ लीक होऊन भाजपपर्यंत कसे पोहोचले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होते. त्याचबरोबर भाजपने जैन यांच्या आजाराची अशा प्रकारे खिल्ली उडवणे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे होते.



कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द


शनिवारी तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. व्हायरल फुटेजमध्ये सत्येंद्र जैन त्यांच्या सेलमध्ये मसाज करताना दिसत होते. तुरुंगाच्या कोठडीत एक व्यक्ती मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पायाला आणि शरीराला मालिश करताना दिसला. याबाबत ईडीने या संपूर्ण प्रकरणाची कोर्टात तक्रार केली असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द केले आहेत. सत्येंद्र जैन सध्या तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत. सत्येंद्र जैन यांना सुविधा दिल्याप्रकरणी तुरुंग अधीक्षकांसह चार तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 हून अधिक तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तुरुंग बदलण्यात आले.
 
ईडीकडून जैन यांना 30 मे रोजी अटक
आम आदमी पार्टी नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांखाली अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 अंतर्गत जैन यांच्या कुटुंबातील आणि कंपन्यांच्या 4.81 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या मालमत्तांचा समावेश होता.


जैन यांचे सर्व शेअर्स पत्नीला ट्रान्सफर 
जैन यांच्यावर दिल्लीत अनेक शेल कंपन्या सुरू केल्याचा किंवा खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच कोलकाता स्थित 54 शेल कंपन्यांच्या माध्यमातून 16.39 कोटी रुपयांचा काळा पैसाही कमावला. प्रयास, इंडो आणि अकिंचन नावाच्या कंपन्यांमध्ये जैन यांचे मोठ्या प्रमाणात शेअर्स होते. रिपोर्ट्सनुसार, 2015 मध्ये केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर जैन यांचे सर्व शेअर्स त्यांच्या पत्नीला ट्रान्सफर करण्यात आले होते. अटकेनंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईडीने जैन यांना मनी लाँड्रिंगची कागदपत्रे दाखवून प्रश्न विचारले असता त्यांनी कोरोनामुळे स्मरणशक्ती गमावल्याचा दावा केला.