Viral Video : आजवर या जगात अनेक उंच गगनचुंबी तुम्ही पाहिल्या असतील, मात्र तुम्ही कधी खिडक्या नसलेली इमारत पाहिली आहे का? आश्चर्याची बाब म्हणजे ही इमारत 29 मजली आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


 


मानवाने बनवलेल्या गोष्टी देखील आश्चर्यापेक्षा कमी नाहीत
तसं पाहायला गेलं तर, हे जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे, ज्यापैकी काही गोष्टी नैसर्गिक आहेत, तर काही गोष्टी मानवाने स्वतः बनवल्या आहेत, परंतु मानवाने बनवलेल्या गोष्टी देखील आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. जगातील सर्वात उंच इमारत म्हणून आपण बुर्ज खलिफा अनेकांना माहित आहे, आणि इतर आश्चर्यापेक्षा कमी नाही. जगभरात अशा अनेक आश्चर्यकारक इमारती आहेत, ज्या लोकांना विचार करायला भाग पाडतात. सध्या अशाच एका इमारतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत.


 


या इमारतीत व्हॅम्पायर्सचे वास्तव्य?



व्हिडीओमध्ये दाखवलेली ही इमारतही आश्चर्यकारक आहे. ही एक 29 मजली इमारत आहे, पण त्यात खिडक्या कुठेच दिसत नाहीत. या उंच इमारतीत कोण राहात असेल, याचे लोकांना आश्चर्य वाटते. या इमारतीत व्हॅम्पायर्सचे वास्तव्य असावे, असे नेटकरी कमेंट करू लागले आहेत. चित्रपटांमध्येही अशाच काही इमारती दाखवण्यात आल्या आहेत, ज्यांना व्हॅम्पायर्सची घरे म्हणतात.


 






 


 


या इमारतीला खिडक्या नाहीत
ही 29 मजली इमारत अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या आगळ्यावेगळ्या इमारतीचे वैशिष्टय़ म्हणजे या इमारतीला खिडक्या नाहीत, पण विचार करण्यासारखे आहे की येथे लोक कसे राहतील? हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @NoCapFights नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.


 


नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया


अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 76 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मला वाटते की हे फेडरल जेल आहे. शिकागो शहरात असेच एक आहे, तर दुसर्‍या यूजरने गंमतीने लिहिले, 'मला विश्वास आहे की हे 'मेन इन ब्लॅक'चे मुख्यालय आहे.


 


संबंधित बातम्या


Amchya Papani Ganpati Anla:'मला मोठेपणी रितेश देशमुखसारखं व्हायचंय...'; "आमच्या पप्पांनी गणपती आणला" फेम साईराज केंद्रेनं व्यक्त केली इच्छा