Amchya Papani Ganpati Anla: "आमच्या पप्पांनी गणपती आणला" (Amchya Papani Ganpati Anla) या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला क्युट हावभाव करताना दिसत आहे. या चिमुकल्या मुलाचं नाव साईराज केंद्रे आहे. साईराज हा चार वर्षांचा आहे. साईराजच्या "आमच्या पप्पांनी गणपती आणला" या गाण्यावरील व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी लाइक केलं आहे. नुकतीच एबीपी माझाने साईराज केंद्रेची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये साईराजनं एक इच्छा व्यक्त केली आहे.
मोठेपणी काय व्हायचं आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर साईराजनं 'रितेश देशमुख' असं उत्तर दिलं. तो म्हणाला, रितेश देशमुख हिरो आहे, मलाही मोठेपणी हिरो व्हायचं आहे.
साईराज केंद्रेनं सांगितलं की, व्हिडीओमधील डान्सची तयारी करायला त्याला दोन दिवस लागले. पुढे तो म्हणाला, 'मी स्टाईल मे रहने का आणि ए आई मला पावसात जाऊ दे हे व्हिडीओ केले आहेत. मी एलकेजीला आहे.मला आभ्यास करायला, खेळायला आणि डान्स करायला आवडतं.'
साईराज केंद्रेच्या वडिलांनी सांगितलं की, 'तो दीड वर्षाचा होता तेव्हा त्यानं ए आई मला पावसात जाऊ दे या कवितेचा व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर त्यानं ती कविता स्वत:च म्हटली.'
पाहा व्हिडीओ:
साईराज केंद्रेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील त्याच्या विविध व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. त्याला 227K फॉलोवर्स आहेत. साईराज केंद्रेनं 'राधा राधा' या गाण्यावरील व्हिडीओ देखील शेअर केला आहे. "आमच्या पप्पांनी गणपती आणला" या गाण्यावरील साईराजच्या व्हिडीओला चार मिलियन्सपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच त्याचा हा व्हिडीओ एक मिलियन्सपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. साईराजच्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :