Viral Video: सोशल मीडियावर वेगवेगळे हटके व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. विनोदी व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती फूड डिलिव्हरी बॉयचं स्वागत चक्क हातात आरतीचं ताट घेऊन आणि टिळा लावून करतो. 


ऑनलाइन पद्धतीनं फूड ऑर्डर केल्यानंतर ते लगेच मिळावं अशी अपेक्षा काहींची असते. फूड डिलिव्हरी अॅपमधून तुम्ही फूड डिलिव्हरी बॉयचं लोकेशन ट्रॅक करु शकता. फेस्टिव्हल सिझनमध्ये किंवा पाऊस पडत असेल तर ट्रॅफिक जॅममुळे फूड डिलिव्हरी व्हायरला उशीर होऊ शकतो. नुकतच दिल्लीमधील एका व्यक्तीनं फूड डिलिव्हरी बॉयला उशीर झाल्यानं चक्क त्याचं टिळा लावून स्वागत केलं. 


संजीव त्यागी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'आइए आपका इंतजार था' असं म्हणत फूड डिलिव्हरी बॉयचं स्वागत केलं जात आहे. हा  डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन येतो. त्यानंतर एक व्यक्ती त्या डिलिव्हरी बॉयला टिळा लावतो. त्या व्यक्तीच्या हातात आरतीचं ताट असतं. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'दिल्लीमध्ये ट्रॅफिक असूनही जेव्हा तुमची ऑर्डर मिळते.' या व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे, 'जेव्हा तुम्ही चार तास वाट बघता'


व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 
या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. व्हिडीओला 4.9 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 430k पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रत्येक डिलिव्हरी बॉयचं स्वागत असंच करायला हवं. '


पाहा व्हिडीओ:



वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Trending News : असा पकडला चोर; फूड डिलेव्हरी बॉय मारत होता कस्टमरच्या ऑर्डरवर ताव, अन्...